Leopard Viral Video: जंगलात घडणाऱ्या घटना नेहमीच रहस्यमय आणि थरारक असतात. पण, सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका बिबट्याचा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. बिबट्या हा किती खतरनाक शिकारी आहे हे काही वेगळं सांगायला नको. गर्द झाडी असो वा गडद अंधार, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही बिबट्या शिकार करण्याची क्षमता ठेवतो. सध्या सोशल मीडियावर एक अंगावर शहारे आणणारा बिबट्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय ते दृश्य केवळ दुर्मीळच नाही, तर प्रकृतीची अफाट ताकद आणि बिबट्याची शिकार कौशल्यदेखील दाखवतो.

हा व्हिडीओ एका घनदाट जंगलात शूट करण्यात आला असून, त्यात बिबट्या आपल्या मागच्या दोन पायांवर उभा राहून जंगलात शिकार शोधताना दिसतो. होय, तो चक्क दोन पायांवर शांतपणे उभा राहून आपला संभाव्य बळी कुठे आहे हे पाहत असतो. त्याचे डोळे लक्ष केंद्रित करत असतात, हालचालींचा अंदाज घेत असतात. बिबट्या असा वागताना फार कमी वेळा पाहायला मिळतो. तो थेट आपल्या मागच्या दोन पायांवर उभा राहून शिकार शोधतो, हे दृश्य इतकं दुर्मीळ आहे की क्षणभर वाटतं एखाद्या सिनेमाचा ॲक्शन सीन चालू आहे. त्याचे डोळे जंगलाच्या दिशेने रोखलेले, शरीर स्थिर आणि वातावरणात पूर्ण शांतता… पण, त्या शांततेखाली लपलेली होती शिकारीची स्फोटक तयारी.

जवळजवळ अशक्य वाटणारा स्टंट

बिबट्यासारखा प्राणी सामान्यतः आपल्या चारही पायांवर फिरतो, धावतो आणि शिकार करतो. पण, या व्हिडीओमध्ये तो केवळ मागच्या दोन पायांवर उभा राहून सावज शोधतो, हे पाहणं म्हणजे जंगलातील नैसर्गिक थरार अनुभवण्यासारखं आहे. विशेष म्हणजे, एक प्रौढ बिबट्या स्वतःच्या वजनाच्या दुप्पट असलेला शिकारही झाडावर ओढून नेऊ शकतो. हे बळ, वेग आणि बुद्धिमत्तेचं असं त्रिकूट फार थोड्या प्राण्यांमध्ये आढळतं.

व्हिडीओवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

हा व्हिडीओ पाहून अनेक वाइल्डलाइफप्रेमी आणि युजर्सनी बिबट्याच्या या अद्भुत क्षमतेचं भरभरून कौतुक केलं आहे. कुणी त्याला “जंगलचा सुपरहिरो” म्हटलं, तर कुणी लिहिलं, “इतकं शांत, पण तितकंच घातक… हे दृश्य आयुष्यभर विसरता येणार नाही”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

अशा प्रकारचे व्हिडीओ आपल्याला केवळ रोमांच देत नाहीत, तर जंगलातील जीवन किती अनोखं आणि अप्रतिम आहे याचीही आठवण करून देतात. बिबट्यासारखे प्राणी हे निसर्गाचं अफाट सामर्थ्य, सौंदर्य आणि शिस्त दाखवतात.