Lightning Striking On car: वीज जेव्हा आकाशात कडाडत असते तेव्हाच आपल्या काळजाचं पाणी पाणी होतं आणि ती वीज कोसळताना पाहिलं की मग हृदयाचा ठोकाच चुकतो. कल्पना करा की, जर वीज अचानक तुमच्या अंगावर कोसळली तर? होय. अंगावर शहारे उभे राहिले असतील ना? अगदी असाच एक प्रसंगाचा अंगावर काटा अणणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतका भयानक प्रसंग अनुभवल्यानंतर कारमधील लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

तुम्ही आतापर्यंत रस्त्यावर अपघाताचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर रहदारी सुरु आहे. अचानक एका कारवर वीज कोसळते आणि कारचं नियंत्रण सुटतं. कारमधून धूरही निघतो आणि थोड्याच अंतरावर जाऊन कार थांबते. त्यानंतर रस्त्यावरील लोक कार चालकाला वाचवण्यासाठी धाव घेतात. हे अपघाती दृश्य थरारक असून कोणी विचारही केला नसेल. अचानकपणे अशा धक्कादायक घटना घडत असतात. इतका भयानक प्रसंग अनुभवल्यानंतर कारमधील लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली होती.

रस्त्यावर होणाऱ्या अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कधी कसा कुठे अपघात होईल याचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: पुण्यात शिक्षिकेच्या प्रयत्नानं गावातील १९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, गावकऱ्यांनी नवीकोरी कार देत केला सन्मान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ पाहून सारेच जण आश्चर्यचकित होऊ लागले आहेत. विजेचा आतापर्यंत सर्वात भयंकर स्ट्राइक होता” असं काही युजर्सनी म्हटलंय. जर वीज अचानक तुमच्या अंगावर कोसळली तर? होय. अंगावर शहारे उभे राहिले असतील ना? अगदी असाच एक प्रसंग एका कुटुंबासोबत घडला.