Viral video: ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. अगदी बिबट्या सुद्धा. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. कधी कुठून आपल्यावर कसा हल्ला होईल याचा मागमूसही नसतो. त्यामुळे प्रत्येक पावलावर सावध राहील नाही तर जीवानीशी जाण्यावाचून प्राण्यांकडे पर्याय नसतो.सिंह श्रेष्ठ की बिबट्या असा प्रश्न अनेकदा पडला असेल. असाच एक बिबट्या आणि सिंहाच्या लढाईचा व्हिडीओ समोर आला आहे.

बिबट्याची गणना धोकादायक आणि निर्दयी शिकारी प्राण्यांमध्येही केली जाते. याला सायलेंट किलर असेही म्हणतात. हा प्राणी एका झटक्यात आपल्या शिकारीवर तुटून पडतो. दिसायला सिंह आणि वाघापेक्षा तो खूपच लहान असला तरी तो अतिशय चपळ आणि दुष्ट भक्षक आहे. शिवाय त्याची शरीररचना अशी असते की तो उंचच उंच अशा झाडांवर सुद्धा सहजरित्या चढू शकतो. अन् याचाच फायदा त्यानं सिंहिणीला धडा शिकवण्यासाठी घेतला.

हे बघून तुम्हाला बिबट्याच्या ताकदीचा अंदाज येईल

तर झालं असं की सिंहीण बिबट्याचा पाठलाग करत झाडावर चढली. पण बिबट्यासुद्धा डोकेबाज त्यानं हळूहळू सिंहिणीला अत्यंत कमकूवत असलेल्या फांदीवर नेलं. मग काय फांदीवर जोर पडलाच ती मोडली आणि दोघंही खाली पडले. पण बिबट्या उंच उड्या मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे खाली पडताच त्यानं आपलं संतुलन राखलं आणि तो पळून गेला. पण दुसरीकडे सिंहिण मात्र जबरदस्त दुखापतीमुळे खालीच बसून राहिली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी २ तरुणी आपसांत भिडल्या, इंजिनीयरिंग कॉलेजमधला लाजीरवाणा प्रकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिबट्याचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शन दिले आहे, लेपर्ड पॉवर. व्हायरल झालेली ही क्लिप अवघ्या काही सेकंदांची आहे, पण ती पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. कमेंट सेक्शनमधील प्रत्येकजण हेच सांगत आहे, हा प्राणी खरोखरच शक्तिशाली आहे.