अनेक प्राणीप्रेमी मोकळ्यावेळेत जंगल सफारी करण्यासाठी जातात. या वेळेत वेगवेगळ्या प्राण्यांना जवळून पाहता यावे, त्यांचे निरीक्षण करता यावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यातही वाघ, सिंह असे प्राणी लांबून दिसले तरी भीती वाटते. अशावेळी जर अचानक तुमच्या गाडीत असा एखादा प्राणी शिरला तर? या कल्पनेनेही भीती वाटते. सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये असेच घडले आहे, पण त्यामध्ये एक ट्विस्ट आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या.
सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये काहीजण एका गाडीतून जंगल सफारीसाठी निघाले असल्याचे दिसत आहे. पण त्याचवेळी लांबून त्यांना एक सिंहीण गाडीजवळ येताना दिसते. इतकेच नाही तर ही वाघीण चक्क त्या गाडीत शिरली. पण त्या व्यक्तींवर हल्ला न करता, ती त्यांना लळा लावत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल, पाहा व्हायरल होणारा हा व्हिडिओ.
व्हायरल व्हिडीओ :
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला ५५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये दिसणारी सिंहीण ही पाळीव प्राण्यांप्रमाणे गाडीतल्या सर्वांना लळा लावत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहा.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :
आणखी वाचा : नीलगाईला लांबून पाहताच वाघाने केले असे काही की…; थक्क करणारा व्हिडीओ होतोय Viral
हा व्हिडीओ भीतीदायक पण त्याचवेळी चेहऱ्यावर हसू आणणारा असा आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.