आजोबा हे नातवाचा पहिला मित्र असतो, आणि नातु हा आजोबाचा शेवटचा मित्र असतो. नातवंडं म्हणजे आजोबांसाठी दुधावरची साय. अगदी जीव की प्राण. ते वागतातच इतकं प्रेमाने तर कशाला नातवंडं घाबरतील त्यांना.असाच आजोबा आणि नातवाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामधून नातवंड आजोबांवर कसे डोळे बंद करुन विश्वास ठेवतात हे पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक नातू आपल्या आजोबांच्या तळहातावर उभा राहून डान्स करताना दिसत आहे. हा मुलगा जराही घाबरत नसून बिंधास्त उभा आहे. चिमुकला नातू आणि वृद्ध आजोबांची ही जोडी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उतार वयात जोडीदार सोडून जातो तेव्हाच याच नातवंडांचा आधार असतो. आणि लहान असताना हाच आजोबा मुलांचा पहिला मित्र असतो. म्हणूनच आजोबा हा नातवाचा पहिला मित्र आणि नातू हा आजोबाचा शेवटचा मित्र असतो असे बोलले जाते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – संपत्तीसाठी सुनेनं सासूची केली भयंकर अवस्था! गाल चावला, केस ओढले अन्…Video व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@NarendraNeer007 या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला असून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने भावूक होत हे सूख सगळ्यांच्याच नशिबात नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.