सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ शेअर केले जातात. यातील अनेक व्हिडीओ लोकांना हसवणारे असतात तर काही व्हिडीओ अंगावर शहारे आणणारे असतात. तुम्ही आतापर्यंत वानराला इथून तिथे उड्या मारताना पाहिलं असेल, काही वानरांनी लोकांच्या हातातील वस्तू पळवून नेलेलं पाहिलं असेल. अनेकदा तर वानरांच्या मस्तीचे व्हिडीओ सुद्धा तुम्ही पाहिले असतील. पण मारामारी करणारे वानर तुम्ही कधी पाहिले का? होय हे खरंय. एका लहान मुलासोबत मारामारी करणाऱ्या वानराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ मोठ्या संख्येने पाहिला जात असून सारेच जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओने एकच खळबळ उडाली आहे. कारण, या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा आणि वानर यांच्यात जबरदस्त फाईट सुरू असल्याचं दिसून आली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना त्याचं हसू आवरणं अवघड झालं आहे आणि सोबत या व्हिडीओचा आनंद घेत आहेत.

आणखी वाचा : चिमुकल्या मुलाला कडेवर घेऊन पदवी घेण्यासाठी आली महिला, भावूक करणारा हा VIRAL VIDEO पाहाच

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक छोटा मुलगा या वानराची खोड काढताना दिसून येतो. मग या वानराला पण राग येतो आणि लहान मुलासोबत भिडतो. मग काय या दोघांमध्ये अगदी तगडी फाईट सुरू होते. वानर आणि मुलामध्ये झालेली फाईट यापूर्वी तुम्ही कधी पाहिली नसेल. दोघेही एकमेकांना पकडून खाली आपटण्याचा प्रयत्न करत आहेत. पण दोघेही अगदी ताकदीने एकमेकांसोबत लढाई देताना दिसून येत आहेत. हा छोटा चिमुकला सुद्धा वानरापुढे हार मानायला तयार झाला नाही. वानरासोबत भिडताना या छोट्या चिमुकल्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती मात्र दिसून आली नाही.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : परवानगीशिवाय काढत होती फोटो, मग हत्तीने तरूणीला चांगलाच धडा शिकवला

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : या पठ्ठ्याने दोन दिवसात बनवले सिक्स पॅक अ‍ॅब्स, विश्वास नसेल होत तर हा VIRAL VIDEO पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ dalpat__rana_21 नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. लोक हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आतापर्यंत २ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. वानरासोबत मुलाची अशी झुंज पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतरही लोकांचा यावर विश्वास बसत नाही.