scorecardresearch

चिमुकल्या मुलाला कडेवर घेऊन पदवी घेण्यासाठी आली महिला, भावूक करणारा हा VIRAL VIDEO पाहाच

एकदा आई झाल्यानंतर बाळाचं सगळं काही करण्यात आपण गुंततो आणि मग कसलं करियर आणि कसलं शिक्षण, असं अनेकदा तुम्ही महिलांना बोलताना ऐकलं असेल. अशा महिलांना हा व्हायरल व्हिडीओ प्रेरित करत आहे.

Mother-Child-Viral-Video
(Photo: Instagram/ goodnews_movement )

अडाणी आई घर वाया जाई, शिकलेली आई घर पुढे नेई अशी एक म्हण तुम्ही ऐकली असेल. एकदा आई झाल्यानंतर बाळाचं सगळं काही करण्यात आपण गुंततो आणि मग कसलं करियर आणि कसलं शिक्षण, असं अनेकदा तुम्ही महिलांना बोलताना ऐकलं असेल. पण याच विचारांना फाटा देत एक महिला चक्क आपल्या बाळाला कडेवर घेत पदवीची डिग्री घेण्यासाठी स्टेजवर आली. हे पाहून सारेच जण आश्चर्यचकित झाले पण सोबत हा अभिमानास्पद क्षण पाहताना तिथल्या लोकांचे डोळे पाणावले. या क्षणाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

आयुष्यातील काही ठराविक क्षण हे प्रत्येक स्त्रीसाठी खूप खास असतात, असे क्षण ती आयुष्यभर लक्षात ठेवत असते. पदवी मिळवण्याचे स्वप्न सारेच जण पाहत असतात. पण या महिलेने जे स्वप्न पाहिलंय ते काहीसं वेगळं आहे. या महिलेसाठी पदवी घेण्याचा क्षण खास ठरला जेव्हा तिने आपल्या बाळाला तिच्या हातात घेऊन ही महाविद्यालयीन पदवी घेतली. हा व्हायरल व्हिडीओ पाहून कोणीही भावूक होऊ शकतो. कारण या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक विद्यार्थी आणि आई झाल्याचा आनंद या महिलेच्या चेहऱ्यावर एकत्र दिसत आहे. ज्या महिलांना वाटते की त्यांचा व्यावसायिक प्रवास लग्नानंतर आणि मूल झाल्यानंतर संपतो, त्यांच्यासाठी हा व्हिडीओ प्रेरणादायी ठरेल.

आणखी वाचा : वडिलांची सेकेंड हॅंड सायकल पाहून आनंदाने उड्या मारू लागला चिमुकला, पाहा हा VIRAL VIDEO

सकारात्मकता पसरवण्यासाठी हा व्हिडीओ गुडन्यूज मूव्हमेंट या प्रसिद्ध इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. डिग्री हातात येताच ही आई आपल्या बाळाला घेऊन आनंदाने उड्या मारू लागते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. हा व्हिडीओ पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं. एखादी गोष्टी आपण करायची ठरवली तर लाख अडचणी आल्या तरी प्रयत्न कधी सोडायचे नाहीत आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी धडपड सुरूच ठेवायची. असाच संदेश देणारा हा व्हिडीओ अनेकांना प्रेरित करत आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पेट्रोल पंपावर गाडी थांबवण्याची चूक पडली महागात, डोळ्यादेखत चोरट्यांनी गाडी पळवून नेली

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Viral Video: घरात चोरी करण्यासाठी घुसला चोर; मग पुढे काय घडलं? हे पाहून हसून-हसून दुखेल पोट

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून लोक तो पुढे सोशल मीडियावर इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ५१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केलंय. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडत महिलेचं कौतूक केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Woman took her journalism degree with her child emotional viral video prp

ताज्या बातम्या