Little Boy Funny Viral Video : सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपण अनेकदा पाहतो. या व्हिडिओंमध्ये तुम्ही अनेकदा लोक वेगवेगळ्या गोष्टी करताना पाहतात. यात बऱ्याचदा लहान मुलांचे व्हिडीओ व्हायरल होतात. मुलं ही देवाघरची फुलं असतात, असं म्हणतात. खरंच किती निरागस असतात ही मुलं…लहान मुलांना बघताक्षणीच मनं कसं प्रसन्न होऊन जातं. त्यांचे बोबडे बोल, ते निरागस प्रश्न त्यांची एखादी कृती आपल्याला जग विसरायला लावतं. लहान मुलांचे सोनेरी क्षण हे प्रत्येक आई वडिलांसाठी मोलाचे असतात. असाच एक निरागस आणि गोंडस मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाह हसू आवरणार नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घरात सगळे तरुण जमले आहेत. यावेळी तिथे एक चिमुकलाही दिसत आहे. याच चिमुकल्याची सगळे तरुण मजा, मस्करी करत आहेत. अशातच हे तरुण चिमुकल्याला तू किती बायका करणार आहेस? असं विचारात यावर हा चिमुकला हात वर करुन दोन बायका करणार दोन असं अकमद बिनधास्तपणे सांगतोय. हे ऐकून मजा घेणारे तरुणही हसू लागतात. तर हा चिमुकलाही स्वत: मोठ मोठ्याने हसू लागतो. या चिमुकल्याचं हसू पाहून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही.

लहान बाळांच्या गोड आणि खट्याळ बोलण्याने तसेच त्यांच्या निरागसतेचे नेटकरीसुद्धा वेडे होतात. कदाचित याच कारणामुळे छोट्या बाळांचे मजेदार व्हिडीओ अपलोड केले जातात. सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. हे व्हिडीओ पाहून दिवसभराचा थकवा नाहीसा होतो आणि आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य येतं. एका चिमुकल्याने सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ pranavdhuri05 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “कोकणातील पोरांचा नाद नाय” तर आणखी एकानं “हा तर खूपच हुशार निघाला” अशी प्रतिक्रिया दिली आहे. आणखी एका युजरने ‘वाह किती छान आहे’ अशी कमेंट केली आहे.