Girls Kidnapped Fact Check Video : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे आढळून आला आहे, ज्यामध्ये दावा केला आहे की, एका तरुणाने धाडस करत नवी दिल्लीतून तीन अपहरण झालेल्या मुलींची सुटका केली आहे.

या दाव्यात असे म्हटले आहे की, बनावट नोकरी एजन्सी चालवणारे काही लोक मुलींना लक्ष्य करतात, परदेशात नोकरी देण्याचे आमिष देत नंतर त्यांचे अपहरण करतात. पण अशाचप्रकारे अपहरण झालेल्या तीन मुलींची एका सुसंस्कृत तरुणाने एका घरातून सुखरुप सुटका केली आहे. इतरांना, विशेषतः पाश्चात्य संस्कृतीने प्रभावित झालेल्या मुलींना सावध करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. पण खरंच अशाप्रकारची कोणती घटना घडली का? याविषयीचे सत्य जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर Monk Bharath यांनी व्हायरल दाव्यासह व्हिडिओ शेअर केला.

अर्काइव्ह व्हर्जन.

https://archive.ph/iKOiM

इतर युजर्स देखील अशाच दाव्यांसह व्हिडिओ शेअर करत आहेत. यात काही मराठीतही कॅप्शन देत व्हि़डीओ पोस्ट करतायत.

तपास:

या व्हिडिओच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर दिसतो, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, व्हिडिओ मनोरंजनासाठी बनवण्यात आला आहे.

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड केला आणि त्यातून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केला. यावेळी आम्हाला यूट्यूबवर अपलोड केलेला एक व्हिडिओ सापडला.

या व्हिडिओला २.३ मिलियन व्ह्यूज मिळाले होते आणि तो एक वर्षापूर्वी अपलोड करण्यात आला होता.

आम्ही प्रोफाइल तपासले आणि त्याच्या यूट्यूब प्रोफाइलवर असे अनेक व्हिडिओ असल्याचे आढळले.

आम्हाला नवीन जांगरा यांचे इन्स्टाग्राम हँडल देखील सापडले.

हा व्हायरल व्हिडिओ १३ एप्रिल २०२३ रोजी त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर कोणत्याही कॅप्शनशिवाय अपलोड करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष:

एका व्हिडिओ निर्मात्याने मनोरंजनासाठी तयार केलेला एक स्क्रिप्टेड व्हिडिओ आहे, जो आता नवी दिल्लीतील खऱ्या घटनेचा असल्याचा खोटा दावा करत व्हायरल केला जात आहे, त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.