Viral Video : लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. लग्नामुळे दोन व्यक्तींचे आयुष्य बदलते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कायम एकमेकांबरोबर राहण्याचे वचन दिले जाते. हे नातं काळजी, विश्वास आणि प्रेमावर टिकते. लग्नासाठी आतुर असलेल्या एका तरुणाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, “प्रेम म्हणजे प्रेम असतं.”

या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या तरुणाच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे आणि त्याला स्पर्श करुन त्याची होणारी बायको कोणती आहे, हे ओळखायचे आहे. हा एक खेळ आहे. तो सुरुवातीला दोन मुली आणि दोन मुलांच्या हाताला स्पर्श करतो आणि त्यांचा हात सोडतो त्यानंतर तो आणखी एका मुलीच्या हाताला स्पर्श करतो तेव्हा तो तिचा हात सोडत नाही आणि हात शेवट पर्यंत धरुन ठेवतो. अशाप्रकारे डोळ्यावर पट्टी असतानाही तो त्याच्या होणाऱ्या बायकोला ओळखतो.

हेही वाचा :Desi Jugad : स्टॅपलर पिन्सपासून बनवली चक्क कार; आनंद महिंद्रांनी दिली नोकरीची ऑफर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

bhoomievents या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ” त्याने त्याच्या होणाऱ्या बायकोचा हात स्पर्शाने ओळखला आहे आणि तिचा हात आता आयुष्यभर तो धरुन ठेवणार आहे.”
या व्हिडीओवर युजर्सच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.