सोशल मीडियावर आपणाला अनेकदा जगभरातील विचित्र प्रेम कहाणी वाचायला आणि पाहायला मिळतात. नुकतीच अशीच एक विचित्र प्रेम कहाणी समोर आली आहे, जी ऐकून सगळेच थक्क झाले आहेत. बिहारमधील जमुईमध्ये एका जावायाचा लुडो खेळता खेळता आपल्या सासूवर जीव जडला. यानंतर गावकऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी मिळून सासू आणि जावई दोघांनाही चांगलीच अद्दल घडवली आहे.
आपल्याला अनोख्या प्रेम प्रकरणाचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. पण सध्या बिहारमधील जमुई येथील रहिवासी असलेले चंदन गोस्वामीच्या विचित्र प्रेमाची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या चुलत सासूला भेटण्यासाठी भावाच्या घरी गेला असता गावकऱ्यांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. जखमी जावयाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याचंही सांगण्यात येत आहे.
विधवा सासूला लावला जीव –
चंदन गोस्वामी हा अनेकदा सासरी जायचा. जिथे तो त्याच्या विधवा चुलत सासूबरोबर लुडो खेळायचा. लुडो खेळताना सासू आणि जावई कधी एकमेकाच्या प्रेमात पडले याचा कोणालाही थांगपत्ता लागला नाही. तर या दोघांमध्ये लॉकडाऊनच्या काळापासूनच अवैध संबंध असल्याचं समोर आलं आहे. शिवाय रात्री उशिरा सासूला भेटायला आलेल्या जावयाला गावकऱ्यांनी पकडून चांगलाच चोप दिला.
हेही पाहा- वडील बदकाच्या पिल्लांना मदत करायला गेले ते परतलेच नाहीत, मुलांच्या डोळ्यासमोर घडली दुर्दैवी घटना
गावकऱ्यांनी जावयाला घडवली अद्दल –
गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत जावई जखमी झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवाय या प्रकरणाची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी चंदनचे त्याच्या विधवा चुलत सासूशी अवैध संबंध असल्याचे प्रकरण समोर आल्याचे सांगितले, तसेच या घटनेचा तपास पुर्ण झाल्यानंतर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही पोलिसांनी म्हणाले. दुसरीकडे सासू आणि जावयाच्या विचित्र प्रेमाची ऐकून परिसरातील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.