जगभरात अनेक छोट्या-छोट्या वस्तू आहेत, ज्या दिसायला जरी छोट्या असल्या तरी त्याच्या किंमतीची तुम्ही कल्पना करू शकत नाही. यातील एक वस्तू म्हणजे नेल पॉलिशी. सध्या एक नेल पॉलिश जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. या चर्चे मागचे कारण म्हणजे तिची किंमत. या नेल पॉलिशच्या किंमतीची तुलना मुंबईतील एका अलिशान फ्लॉटच्या किंमती एवढी असल्याचा दावा केला जात आहे. पण हा दावा कितपत खरा आहे जाणून घेऊ..
जगातील सर्वात महागडी नेलपॉलिश
नेलपॉलिशच्या या एका बाटलीची किंमत ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असेल. कारण साधारणपणे एका नेलपॉलिशच्या छोट्या बाटलीची किंमत कमीत कमी १० ते २०० किंवा जास्तीत जास्त ५०० रुपये असते. त्यामुळे नेलपॉलिशच्या या किंमती ऐकून आहोत. पण सध्या जगभरात अशी एक नेलपॉलिश व्हायरल होत आहे जिची तुलना एका लक्झरी फ्लॅटच्या किंमतीबरोबर केली जात आहे. ही सर्वात महागडी नेलपॉलिश अॅझेचर ब्रँडची आहे. या नेलपॉलिशच्या डिझायनरने याबाबत अनेक गोष्टींचा दावा केला आहे.
जगातील सर्वात महागड्या नेलपॉलिशचे नाव अजाटुरे म्हणजे Azature असे ठेवले आहे. लॉस एंजेलिसमधील डिझायनर अॅझॅचर पोगोसियन यांनी ही नेल पॉलिश तयार केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिझायनर पोगोसियन हे त्यांच्या लक्झरी वस्तूंसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. पण त्यांनी बनवलेली ही काळ्या रंगाची नेलपॉलिश संपूर्ण जगातली सर्वात महागडी नेलपॉलिश ठरली आहे.
267 कॅरेट ब्लॅक डायमंडचा वापर
या नेल पॉलिशच्या किंमतीबाबत सांगायचे झाल्यास, या नेल पॉलिशच्या एका छोट्या बाटलीची किंमत सुमारे २ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. या बाटलीमध्ये फक्त 150 मिली नेलपॉलिश आहे. म्हणजे या किमतीत तुम्ही मुंबईत एक लक्झरी फ्लॅट खरेदी करू शकता. डिझायनरने त्यात 267 कॅरेट ब्लॅक डायमंडचा वापर केल्याचा दावाही करण्यात आला आहे. यामुळेच कदाचित या नेलपॉलिशची किंमत इतकी जास्त आहे.