अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या आत्मचरित्रात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा उल्लेख गोंधळलेले विद्यार्थी असा केला आहे. “राहुल गांधी एखाद्या घाबरलेल्या विद्यार्थ्यासारखे वाटतात, ज्याने संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला असून आपल्या शिक्षकांना प्रभावित करण्यासाठीही तयार आहे. मात्र कुठेतरी त्या विषयामध्ये प्राविण्य मिळवण्याची योग्यता तसेच चमक या विद्यार्थ्यामध्ये दिसत नाही,” असं ओबामा राहुल यांच्याबद्दल बोलले आहेत. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने ओबामाच्या ‘ए प्रॉमिसिड लँड’ या आत्मचरित्रासंदर्भात एक लेख लिहीला असून त्यामध्येच यासंदर्भातील उल्लेख आहे. बराक ओबामा यांनी आपल्या आत्मचरित्रा जगभरातील राजकीय नेत्यांव्यतिरिक्त इतर विषयांवरही भाष्य केले आहे. मात्र राहुल गांधी यांच्यासंदर्भातील उल्लेखाची सध्या सोशल नेटवर्किंगवर चांगलीच चर्चा असून ओबामा यांनी राहुल यांच्याबद्दल असे शब्द कसे वापरले असा प्रश्न भारतीय नेटकऱ्यांनी विचारला आहे. याचसंदर्भात आक्षेप नोंदवताना नेटकऱ्यांनी ओबामांनी माफी मागावी असंही म्हटलं आहे. #माफ़ी_माँग_ओबामा हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर टॉप ट्रेण्ड होत आहे.

अनेकांनी ओबामा यांनी राहुल गांधींचा जो उल्लेख केला आहे त्यावरुन राहुल यांना ट्रोल केलं आहे. तर अनेक काँग्रेस समर्थकांनी राहुल यांच्याबद्दलच्या वक्तव्यावर आक्षेप घेत ओबामा यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे टीका करणारे आणि राहुल यांना ट्रोल करणारे दोन्ही बाजूचे नेटकरी यासंदर्भात ट्विट करताना #माफ़ी_माँग_ओबामा हा हॅशटॅग वापरत असल्याने हा हॅशटॅग टॉप ट्रेण्डींग आहे. पाहुयात याच हॅशटॅगवरील काही ट्विट…

जळतात माझ्यावर

इथे तरी एकत्र आहेत

ओबामा स्वत:ला समजतात काय?

भाजपाच्या समर्थकांनी ट्रेण्ड केला म्हणे

असा कसा अपमान केला

अमेरिकन म्हणत असतील

हा आमचा अंतर्गत विषय

त्यामुळे ओबामा असं म्हणाले

अन् फॉलो करा

अरे आम्ही…

दरम्यान, आपल्या पुस्तकात बराक ओबामा यांनी राहुल गांधी यांच्या आई आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी तसेच भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही उल्लेख केला आहे. “आम्हाला चार्ली क्रिस्ट आणि रहम एमॅन्युअल यांसारखे पुरूष हँडसम असल्याचं सांगितलं जातं परंतु महिलांच्या सौंदर्याबद्दल सांगितलं जात नाही. यासाठी एक किंवा दोन उदाहरणंच अपवाद आहेत जसं की सोनिया गांधी,” असंही ओबामा सोनियांबद्दल बोलताना म्हणालेत. “भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री बॉब गेट्स यांच्यात एक खरेपणा आणि प्रामाणिकपणा आहे,” असंही ओबामा यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलं आहे. ओबामा यांचं हे पुस्तक १७ नोव्हेंबर रोजी बाजारात उपलब्ध होणार आहे. बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळात २०१० आणि २०१५ मध्ये भारताचा दौरा केला होता.