रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या महिलेचे प्राण वाचवण्यासाठी धावून आले महाराष्ट्र पोलीस

ही महिला ट्रेनच्या जवळ येत असताना रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी उभी होती.

Maharashtra policeman saves woman
हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (फोटो:@uaiser_Khalid/Twiiter)

एका पोलीस कर्मचाऱ्याने शनिवारी एका मानसिकदृष्ट्या असंतुलित असलेल्या महिलेचे प्राण वाचवले, जी लोकल ट्रेन तिच्या जवळ येत असताना रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी उभी होती. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली जेव्हा डहाणू-अंधेरी लोकल वसई रोड रेल्वे स्थानकाजवळ येत होती. याच वेळी पेट्रोलिंग ड्युटीवर असलेले एकनाथ नाईक यांनी पाहिले की एक महिला रेल्वे रुळांच्या मध्यभागी उभी आहे.

व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, महिला दिसल्यानंतर नाईक हे लगेच मोटरमनला ट्रेन थांबवण्याचे संकेत द्यायला सुरुवात करतात. पीटीआयच्या रिपोर्टनुसार एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रेन त्या महिलेच्या अगदी जवळ येऊन थांबली.

एकटीच राहते महिला

रेल्वे ओव्हर ब्रिजवर उभ्या असलेल्या काही पोलिसांकडून नाईक यांनाही सतर्क करण्यात आले. तर दोन रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे (आरपीएफ) कॉन्स्टेबलही त्यांच्या मदतीसाठी धावले. पोलीस अधिकांऱ्याने पीटीआयला सांगितले की, या महिलेचे नाव सुबद्रा शिंदे असे आहे, जी पालघरच्या वसईमध्ये एकटी राहते आणि ती “मानसिकदृष्ट्या अस्वस्थ” आहे.

कौतुकाचा वर्षाव

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नाईक यांनी महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले, तर नंतर त्यांनी सांगितले की, आपण त्या महिलेचे प्राण वाचवू शकलो याचा आनंद वाटतो, तसेच त्यांनी सहकार्यांचे आणि आरपीएफ जवानांचे आभार मानले.

पहा व्हिडीओ

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

सर्वानीच त्यांच्या कामच कौतुक केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra police rushed to save the life of a woman standing on the railway track ttg