एकीकडे काही लोकांना पुत्रप्राप्तीची इच्छा असते. असं असताना महाराष्ट्रातील पुण्यात एका कुटुंबाने मुलीचा जन्म वेगळ्या पद्धतीने साजरा करत नवजात बाळाचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. पुण्यातील शेलगाव येथील एका कुटुंबाने आपल्या नवजात बाळाला हेलिकॉप्टरने घरी आणले आहे.

२२ जानेवारी रोजी भोसरी येथील आईच्या घरी राजलक्ष्मी नावाच्या मुलीचा जन्म झाला. खेडच्या शेलगाव येथील बाळाला तिच्या घरी नेण्यासाठी कुटुंबीयांनी हेलिकॉप्टर भाड्याने घेतले. मुलीचे वडील विशाल झारेकर हे व्यवसायाने वकील आहेत. विशालने यांनी सांगितले की, घरात लक्ष्मीच्या आगमनाने आपण खूप आनंदी आहोत, असे ते म्हणाले.

(हे ही वाचा: वाघिणीने रानडुकरावर केला हल्ला, सुटण्यासाठी तो ओरडत राहिला आणि…; बघा Viral Video)

(हे ही वाचा: Viral: एका छोट्याशा बेडकाकडून महाकाय साप कसा हरला? IAS अधिकाऱ्यांनी शेअर केला संघर्षाचा Video)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक लाख रुपये केले खर्च

विशाल यांनी सांगितले की, “मी माझी पत्नी आणि आमची मुलगी राजलक्ष्मीला २ एप्रिलला हेलिकॉप्टरमधून घरी आणले.” यासाठी एक लाख रुपये खर्च झाल्याचे विशाल यांनी सांगितले. “आम्ही जेजुरीला आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो, पण आम्हाला उतरू दिले नाही. म्हणूनच आम्ही आकाशातून प्रार्थना केली.’ झरेकर पुढे म्हणाले की, हेलिकॉप्टर शेलगाव येथील त्यांच्या शेतात उभारलेल्या तात्पुरत्या हेलिपॅडवर उतरवले.