Viral Video: पूर्वी लग्नसराई म्हटलं की, शुभ मुहूर्त, मानपान, लग्नातील विधी याकडे अधिक लक्ष दिलं जायचं. परंतु, आताच्या लग्नांमध्ये लग्नातील वधू-वराच्या एन्ट्रीचे डान्स, भन्नाट उखाणे, फोटो, व्हिडीओ याकडे अधिक लक्ष दिलं जातं. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने सोशल मीडियावरही लग्नातील अनेक हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक नवरी तिच्या एन्ट्रीला डान्स सुंदर करताना दिसतेय.

लग्न प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात खूप सुंदर आणि आयुष्य बदलणारा क्षण असतो. त्यामुळे या दिवशी वधू आणि वर त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतील अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. सुंदर कपडे, दागिने, मेकअप यासह डान्स, फोटोशूट अशा अनेक गोष्टींची आधीपासून तयारी केली जाते. आजपर्यंत अनेक लग्नांमधील काही हटके गोष्टी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या आपण पाहिल्या असतील. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नसोहळा पार पडत असलेल्या ठिकाणी नवरी आपला होणारा नवरा उभा असलेल्या स्टेजकडे जाता जाता सुंदर डान्स करते. यावेळी ती माझा होशील ना?’, या एका जुन्या मराठी मालिकेच्या शीर्षकगीतावर डान्स करते. तिचा हा सुंदर मनमोहक डान्स सर्व पाहुणेमंडळी कौतुकाने पाहतात. सध्या सोशल मीडियावर तिचा हा डान्स खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @karmgraphy या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओवर आतापर्यंत दोन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

तसेच एका युजरनं यावर लिहिलंय, “खूप सुंदर”. तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “खूपच छान नाचलीस, डोळ्यात पाणी आलं”. तर तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “मस्त, दमदार”.