आनंद महिंद्रा यांच्या ट्विटने झाली त्याची बोलती बंद

एका ट्विटमुळे आनंद महिंद्रा हे ट्विटर युजर्सच्या गळ्यातील ताईत बनले आहेत

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांच्या ट्विटची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे

महिंद्रा अॅंड महिंद्रा, टेक महिंद्रा, महिंद्रा फायनान्स या सारख्या अनेक कंपन्यांचे प्रमुख ही आनंद महिंद्रा यांची ओळख आहे. परंतु सध्या ते एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहेत. त्यांच्या एका ट्विटमुळे ते ट्विटर युजर्सच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
आनंद महिंद्रा यांच्या एका ट्विटचे सध्या चर्चा सर्वत्र सुरू  आहे.  आनंद महिंद्रा यांनी ‘मॅजराती बर्डकेज’ कारचा फोटो आपल्या ट्विटरवर टाकला.  नावाच्या कारचा संदर्भ घेऊन त्यांनी ट्विट केले,  ‘हा असा पिंजरा आहे ज्यामध्ये मला कैद व्हायला आवडेल’.

car_148534676372_650x425

त्यांच्या या ट्विटला एका जणाने उत्तर दिले जर तुम्हाला ही कार इतकीच आवडली तर तुम्ही ती का विकत घेत नाही. कुणी तुम्हाला रोकले आहे असे त्या व्यक्तीने म्हटले.

महिंद्रांना हा प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीने कधी विचार देखील केला नाही असे उत्तर त्याला महिंद्रा यांच्याकडून मिळाले. आम्ही ही कंपनीच विकत घेतली असे उत्तर  महिंद्रा यांनी शांतपणे दिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mahindra and mahindra tech mahindra anand mahindra pininfarina concept car

ताज्या बातम्या