नोकरी हा आजच्या काळातील तरुणांसाठी मोठा प्रश्न आहे. अनेक तरुण असे आहेत जे नोकरी मिळवण्यासाठी धडपडत आहेत तर अनेक तरुण असे आहेत की जे मिळालेली नोकरी टिकवण्यासाठी धडपडत आहे. अशाच काही लोक ऑफिसमध्ये टॉक्सिक वातावरणाला कंटाळलेले असतात तर आणखी चांगला पगाराची नोकरी मिळवण्यासाठी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत काम करताना दिसतात. अशा परिस्थितीत अनेकदा नोकरी सोडताना लोक हटके पद्धतीने राजीनामा देतात. कधी कोणी फक्त ‘बाय’ असा मेल टाकून राजीनामा देते तर कोणी कोणी ‘I Quit’ असे लिहून राजीनामा देतो. अनेकदा तरुणांचे असे राजीनामा सोशल मीडियावर चर्चेत येतात. अशाच एका राजीनामाच्या सध्या चर्चा होत आहे जो जास्तच प्रामाणिकपणे लिहिला आहे.लिंक्डइनवर एका सोप्या पद्धतीने दिलेल्या राजीनामाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हा राजीनामा इतरा प्रामाणिकपणे लिहिला आहे की तो वाचून अनेकांना हसू आले तर अनेकांना धक्का बसला आहे.
मुंबईस्थित हिंग्लिश ब्रँडचे संस्थापक आणि सीईओ शुभम गुणे यांनी शेअर केलेली ही पोस्ट “प्रामाणिक राजीनामा” असे कॅप्शन देऊन शेअर केली आहे. व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये दायित्वा शाह(Dayitva Shah) नावाच्या व्यक्तीचा ईमेल आहे, ज्याने अत्यंत साध्या पद्धतीने राजीनामा दिला आहे, “नमस्कार सर, मैं बिक गया। सामने वाली कंपनी चार पैसा ज्यादा दे राही है.” (मी स्वतःला विकले आहे. दुसरी कंपनी चार पैसे जास्त देत आहे). बसं एवढंच लिहित त्याने राजीनामा दिला आहे. त्याने प्रमाणिकपणे दुसरीकडे चांगल्या पगाराची नोकरी मिळाल्याचे मान्य केले हे पाहून अनेकांना त्याचे कौतुक केले पण तर काहींना इतक्या स्पष्ट शब्दात राजीनामा दिल्याचे पाहून हसू आले.

अनेक लोकांनी त्यांच्या स्वतःच्या राजीनामा ईमेलमध्ये हेच लिहावे अशी त्यांची इच्छा होती असे उत्तर दिले. एका व्यक्तीने कमेंट केली, “प्रामाणिकपणा हा मी ऐकलेला सर्वोत्तम धोरण आहे,” तर दुसऱ्याने म्हटले, “कोण दुनिया, कोण चार लोक.. सर्व महत्त्वाचे म्हणजे पैसे).
एका वापरकर्त्याने लिहिले, “मला वाटते की हा मुद्दा फक्त ४ पैशांपेक्षा जास्त आहे – तो टॉक्सिक वातावरणाचा आहे.” दुसऱ्याने म्हटले, “हे फार रिलेटेबल असल्यासारखे वाटत नाही का? आपण सर्वजण हे म्हणू इच्छितो, परंतु त्याऐवजी आपण हसतो आणि काळजीपूर्वक शब्दात निरोप देतो.”


कामाच्या ठिकाणी प्रामाणिकपणा दाखवल्याचे ही पहिलीच घटना नाही. अलीकडेच अशीच एक घटना चर्चेत आली होती. नोएडा येथील एचआर प्रोफेशनल खुशी चौरसिया यांनी एका नवीन नोकराबद्दल पोस्ट शेअर केली ज्याने पहिल्याच दिवशी काम सोडले. कर्मचाऱ्याने सरळ मेसेजमध्ये म्हटले होते: “मला हे काम आवडले नाही.
चौरसिया यांनी नमूद केले की, मागणी करताना, ऑफरपूर्वीच या भूमिकेचे तपशीलवार स्पष्टीकरण देण्यात आले होते. तरीही, अचानक झालेल्या बदलामुळे ती गोंधळून गेली.