Viral video: सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात, जे अनेकदा मजेशीर किंवा हास्यास्पद असतात. सध्या एका गोरिलाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ धुमाकूळ घालत असून हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या रिअॅक्शन्स देत आहेत. व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका गोरिलाचा आहे. अनेकदा सोशल मीडियावर गोरिलाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.

माणसांप्रमाणे प्राण्यांमध्येही भावना असतात. त्यांनादेखील चांगल्या-वाईट गोष्टीची समज असते. मुके प्राणीही माणसांप्रमाणेच भावना व्यक्त करु शकत नसले तरी त्यांच्यातही भावना असतात. आता काळ बदलल्याने जंगलं नाहिशी झाले आहेत. क्रॉक्रिंटीकरणामुळं जंगलं नाहीशी होत आहेत. अशातच जर आपण प्राण्यांच्या अधिवाशात प्रवेश केल्यास ते आक्रमक होतात. मात्र, कधी कधी असंही होत की प्राणी मानवाची मदत करतात. दरम्यान सध्या समोर आलेल्या एका गोरीलाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

बायकोचा धाक प्रत्येक पुरुषाला असतो, प्रत्येक पुरुष किती नाही म्हणत असला तरी तो आपल्या बायकोला घाबरतोच. पण तुम्हाला माहितीये का हा बायकोचा धाक फक्त माणसांमध्येच नाहीत प्राण्यांमध्येही असतो. याचंच उदाहरण दाखवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये झालं असं की, एका गोरिलानं पर्यटक महिलेच्या केसांना हात लावला. यावेळी या गोरिलाच्या बायकोनं हे पाहिलं आणि नंतर गोरिलाची चांगलीच धुलाई केली. ती स्वतः त्याच्याकडे येते आणि त्याचे केस धरते आणि त्याला मारायला सुरुवात करते. कधी ती त्याला जमिनीवर फेकते, तर कधी लाथा मारते. यावेळी गोरिल्ला शांतपणे मारहाण सहन करत आहे आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. असे दिसते की तो चोरी करताना पकडला गेला आहे, त्यानंतर तो आता लाजेने तोंड लपवत आहे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ @rose_k01 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. पाहिल्यानंतर लोकांना हसू आवरत नाहीये. सोशल मीडिया वापरकर्ते या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने विनोदी पद्धतीने टिप्पणी केली, “शेवटी बायकोचा धाक प्रत्येकालाच.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “पत्नीच्या रागासमोर नवरे घाबरून जातात.शेवटी बायको ती बायकोच “