शौचालय शोधण्यासाठी वणवण ही भारतात फार पूर्वी पासून चालत आलेली व्यथा आहे. विशेषतः प्रवासाच्या दरम्यान स्वच्छ शौचालय नसल्याने अनेकांना समस्यांना सामोरे जावे लागते. सार्वजनिक शौचालयांची अवस्था पाहता अनेकजण विशेषतः स्त्रियांची पंचाईत होते. मात्र या सर्व समस्यांवर एका जुगाडूने कमाल उपाय शोधून काढला आहे. सोशल मीडियावर सध्या या पोर्टेबल शौचालयाचा चांगलाच बोलबाला आहे. केरळचा युट्युबर रेवोकिड याने अलीकडेच पोस्ट केलेला व्लॉग सध्या चर्चेत आहे. यात त्याने कशा प्रकारे आपल्या आवडत्या टोयोटा फॉर्च्युनर गाडीमध्ये टॉयलेट सीट लावून कसे त्याचे रूप पालटले आहे हे बघायला मिळतेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Revokid Vlogs या चॅनेल वरून पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पहिले आहे. गाडीच्या सर्वात शेवटच्या भागात टॉयलेट सीट लावण्यात आली असून. गाडीत पाण्यासाठी एक टॅंक सुद्धा जोडला गेला आहे. टॉयलेट अत्यंत कमी जागेत तयार केलेले आहे केलेले आहे त्यामुळे ते गाडीच्या एका सीटएवढीच जागा व्यापते. याचा अर्थ असा की हे कस्टमाईजेशन झाल्यावर सुद्धा गाडीमध्ये अन्य प्रवाशांसाठी सहा सीट उपलब्ध आहेत.

पहा फॉर्च्युनर मधील टॉयलेटची झलक

ओळखलंत का? दुबईच्या राजपुत्राचा मेट्रो प्रवास; प्रवाशांनी पाहूनही असं काही केलं की..

युट्युबरने या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या या जुगाडाविषयी दिलेल्या माहितीनुसार, ओजस ऑटोमोबाईल या कंपनीने ही अनोखी संकल्पना खरी केली आहे. विशेषतः दिव्यांग किंवा वृद्ध व्यक्तींसोबत प्रवास करताना शौचालयामुळे अडचण होऊ नये यासाठी ही खास सोय तयार करण्यात आल्याचे सांगितले जाते. साधारणपणे अशा प्रकारच्या गाड्यांच्या मॉडिफिकेशनसाठी ७० हजार ते १ लाख रुपये इतका खर्च येऊ शकतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man builds toilet seat in toyota fortuner for long trip check photos svs
First published on: 16-08-2022 at 15:34 IST