How to Prevent Motion Sickness in Children: प्रवासाची आवड तर अनेकांना असते; पण प्रवास सुरू झाला की, लगेचच काही वेळात मळमळ सुरू होते. डोकं दुखू लागतं. काही जणांना तर खूप उलट्या होतात. या त्रासामुळे अनेक वेळा अशा लोकांना कुठंही जायला आवडत नाही. वैद्यकीय भाषेत या आजाराला ‘मोशन सिकनेस’ म्हणतात. अनेकदा मुलांनाही चालत्या गाडीमध्ये उलटी होण्याचा त्रास होतो. त्यामुळे पालकांनाही प्रवासाची मजा घेता येत नाही. मोशन सिकनेसमध्ये कार, बस, विमान, ट्रक इत्यादींमधून प्रवास करताना उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या असते. मोशन सिकनेसमुळे लोकांना प्रवासादरम्यान होणाऱ्या उलट्या थांबत नाहीत. मुलांना होणारा हा त्रास कसा थांबवावा, हे पालकांना कळत नाही. ही समस्या थांबविण्यासाठी मुलांसाठी काय उपाय आहेत, याविषयी आर्टेमिस हॉस्पिटल्समधील इंटरनल मेडिसिनचे वरिष्ठ सल्लागार डॉ. पी. वेंकट कृष्णन यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

डाॅक्टर सांगतात, “लहान मुलांसोबत प्रवास करताना अनेक वेळा समस्यांना सामोरे जावे लागते. मोठ्यांना जर उलटीचा त्रास सतावत असेल, तर लहान मुले कसे करत असतील? चुकीचा आहार, प्रवासादरम्यान किंवा बदलत्या हवामानामुळे मुले नेहमी उलटीमुळे त्रस्त असतात. वांरवार उलटी होत असल्याने मुलांची तब्येत आणखी खराब होऊन जाते. बऱ्याच जणांमध्ये मोशन सिकनेस आढळतो. विशेषतः मुलांना याचा अधिक त्रास होतो. जेव्हा कान, डोळे, जॉईंट्स व मांसपेशीच्या नसा यांना परस्परविरोधी संदेश शरीराला मिळतो तेव्हा मोशन सिकनेस ही समस्या निर्माण होते.”

What should parents do to reduce childrens mobile usage
Health Special : मुलांचा मोबाइल वापर कमी करण्यासाठी आईवडिलांनी काय करावं?
Mumbai Women Buys 19 Flats Worth 118 Crores In Malbar Hill
“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?
71 Kg Weight Loss In Two Years By CEO Dhruv Agrawal Diet Plan Exercise Routine
७१ किलो वजन दोन वर्षांत कमी करताना प्रसिद्ध सीईओने पाळलं ‘हे’ डाएट; पुन्हा वजन वाढू नये याचं सिक्रेटही सांगितलं
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?

(हे ही वाचा: एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!)

CNS ड्रग्समध्ये प्रकाशित झालेल्या १९९९ च्या जर्नल लेखानुसार, “मुलांमध्ये मोशन सिकनेसचा सर्वांत सामान्य प्रकार कार किंवा बस आणि मनोरंजन पार्क राइड्समुळे निर्माण झालेला दिसून येतो.” तथापि, हेदेखील लक्षात घेणे आवश्यक आहे की, प्रौढांपेक्षा लहान मुलांना मोशन सिकनेस होण्याची अधिक शक्यता असते. लहान मुलांना प्रवासात मळमळ-उलट्या होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी, याबाबत डाॅक्टरांनी काही उपाय सांगितले आहेत, ते खालीलप्रमाणे :

१. लांबचा प्रवास असेल, तर त्याआधी मुलांना खूप जास्त खायला देऊ नका. प्रवासापूर्वी मुलांना हलके जेवण द्यावे.

२. प्रवासापूर्वी आणि प्रवासादरम्यान जड, स्निग्ध पदार्थ टाळा.

३. मुलांनी गाडीत झोपणे अधिक चांगले ठरते. कारण, झोपेमध्ये मोशन सिकनेसचा त्रास होत नाही.

४. प्रवास करताना मुलांना खिडकीजवळ बसवा. त्यामुळे उलटी येणार नाही.

५. प्रवासादरम्यान त्यांच्याशी सतत बोलत राहा. त्यामुळे त्यांचे मळमळ होण्याच्या त्रासाकडे दुर्लक्ष होईल आणि त्यांना उलटी होणार नाही.

६. तसेच दर काही किलोमीटरवर गाडी थांबविण्याचा प्रयत्न करा आणि बाहेर पडून शुद्ध हवेचा अुनभव घ्या आणि तुमचा मूड ठीक करा.