Man Covered In Lizards Viral Video : सोशल मीडियावर अनेक विचित्र व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ तर धडकी भरवणारे, तर काही फारच भयानक असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. कारण- या व्हिडीओत एका तरुणाच्या डोक्यावरील केसांपासून पायांच्या बोटांपर्यंत सगळीकडे चक्क पाली फिरताना दिसतायत. घरात एक जरी पाल दिसली तरी आपण दूर पळतो. पण, ही व्यक्ती पालींचा एक समूहच अंगावर घेऊन आरामात फिरतोय. अनेक जण त्याला लिजर्ड मॅन, असे म्हणतायत.

व्हिडीओतील हे दृश्य फार विचित्र आणि धक्कादायक आहे, पण लोक त्यांचे छंद आवड जोपासण्यासाठी काय काय करू शकतात हेही यातून दिसतेय. या व्हिडीओने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतलेय.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीच्या संपूर्ण अंगावर पाली आरामात फिरताना दिसतायत. विशेषत: त्याच्या पँटवर पालींचा मोठा समूहच आहे, तो एकेक करून, त्या पाली बादलीत गोळा करतोय. धक्कादायक बाब म्हणजे तो ज्या खोलीत उभा आहे, तिथेही अनेक पालींचा मुक्त संचार दिसून येतोय, जिथे पाहू तिथे पालीच पाली दिसतायत. यातून असा अंदाज बांधला जातोय की, हा तरुण पालींच्या विक्रीचा व्यवसाय करत असावा. पण, इतक्या मोठ्या प्रमाणात पाली एकाच वेळी अंगावर फिरत असतानाही तो तरुण अजिबात घाबरत नाही. हा व्हिडीओ चीनमधील असल्याचे सांगितले जात आहे.

हा धक्कादायक व्हिडिओ @sports.jx.china नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘एक चिनी तरुण आपल्या शहराचा निरोप घेत पुढे पाली पाळण्यासाठी गावाकडे परततो.’

दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्काच बसला आहे. व्हिडीओ पाहून एका युजरने लिहिले की, एका क्षणासाठी मला वाटले की, ही एक डिझायनर पँट आहे आणि मला त्याची डिझाइन खूप आवडली; पण पुढच्याच क्षणी मी हादरलो. दुसऱ्याने लिहिले की, अरे देवा… जर माझ्याबरोबरच असे काही घडले, तर मी काही सेकंदांत मरेन, मला त्यांची खूप भीती वाटते. तिसऱ्याने लिहिले की, मला लहानपणापासूनच पालीची भीती वाटते, आजही जेव्हा मी पाल पाहतो तेव्हा माझा बीपी लो होतो, मी थरथर कापते आणि माझे हृदय वेगाने धडधडू लागते.