Viral Video: लग्न समारंभ असो किंवा दुसरा एखादा खास क्षण असो; आपल्यातील बरेच जण फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त करतात. फटाके फोडताना अनेकदा सावधगिरी बाळगा, असा संदेश दिला जातो. पण, काही जण रहदारीच्या रस्त्यावर, तर अनेक जण हातात फटाके घेऊन पेटविण्याचाही प्रयत्न करताना दिसतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे या व्हिडीओत एक तरुण फटाक्यांचा पेटता बॉक्स डोक्यावर ठेवून नाचताना दिसला आहे.

व्हायरल व्हिडीओ लग्नाच्या वरातीचा आहे. फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे आणि पुरुषांचा एक गट लग्नाच्या वरातीत नाचताना दिसत आहे. नाचता नाचता मद्यधुंद अवस्थेतील एक जण रस्त्यावर ठेवलेला फटाक्यांनी भरलेला खोका उचलतो आणि तो डोक्यावर ठेवून नाचू लागतो. हे पाहून त्याच्याबरोबर नाचणारे सर्व जण त्याच्यापासून दूर होतात. कारण- त्या खोक्यामधून पेटत्या फटाक्यांच्या ठिणग्या सर्वत्र पसरू लागतात. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.

How Much Rice & Roti You Should Eat In a Day
एका वेळच्या जेवणात भात व पोळ्यांचे आदर्श प्रमाण किती हवे? ताटात कुठल्या गोष्टी किती टक्के हव्यात? तज्ज्ञांनी दिलं सूत्र
Will you be rich before the end of 2024
२०२४ संपण्यापूर्वी तुम्हीही होणार श्रीमंत? शनि देवाच्या कृपेने ‘हा’ मूलांक असणाऱ्या व्यक्तींच्या दारी येणार लक्ष्मी
Pushpalata, Decoration
निसर्गलिपी: पुष्पलता
Navpancham Yog 2024
Navpancham Yog 2024 : १०० वर्षानंतर गुरू अन् केतू निर्माण करणार नवपंचम योग, ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा?
Saneshkhali rape case
संदेशखाली प्रकरणात यु टर्न; टीएमसी नेत्यावरील बलात्काराची तक्रार मागे, भाजपावर आरोप करत पीडित महिला म्हणाल्या, “आम्हाला कोऱ्या कागदावर…’
Famous Odissi Dancer Jhelum Paranjape article on International Dance Day
नृत्याविष्कार!
Review of Mahesh Elkunchwars play Aatmakatha
‘ती’च्या भोवती..! सामान्याकडून असामान्याकडे!
From May To August Shani Maharaj Walk With Golden Feet In Kundal
सोनपावलांनी शनी ‘या’ राशींच्या कुंडलीला देणार चमक; मे ते ऑगस्टमध्ये धनाने भरेल झोळी, आयुष्यात बदलाचा संकेत

हेही वाचा…किंग कोब्राबद्दल ‘ही’ गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? वनाधिकारी यांनी केला खुलासा; पाहा पोस्ट

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, फटाक्यांचा खोका डोक्यावर ठेवून नाचताना त्या मद्यपी तरुणाने घातलेल्या हुडीला आग लागते आणि मग तो घाबरून खोका रस्त्यावर फेकून देतो. खोका रस्त्यावर फेकल्यामुळे वरातीत नाचणारे सर्व जण तेथून पळ काढतात आणि व्हिडीओचा शेवट होतो. स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेची कोणतीही चिंता न करता, त्या तरुणानं केलेलं धाडस अगदीच जीवावर बेतणारं होतं.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @KARTIKMEENA005 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी या मद्यधुंद व्यक्तीला पाहून ‘खतरों के खिलाडी’, ‘एकदम खतरनाक व्हिडीओ’, तर काही जण या विचित्र पराक्रमावर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करतानाही व्हिडीओखाली कमेंटमध्ये दिसून आले आहेत.