बाजारामध्ये भाजी चिरण्याची विविध साधने आपल्याला पाहायला मिळतात. तसेच भाजी झटपट चिरता यावी यासाठी सोशल मीडियावर अनेक टिप्ससुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, स्वयंपाकात जवळपास दररोज वापरल्या जाणाऱ्या मिरच्यांना ठेचण्यासाठी/बारीक करण्यासाठी बनवण्यात आलेल्या कटरचा एक भन्नाट व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने चक्क दाढी करायची ब्लेड आणि रिकामी डबी वापरून एक इलेक्ट्रिक मिरची कटर बनवलेला आहे. त्याने हे नेमके कसे केले आणि यावर नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहू.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर sagar.experiment नावाच्या अकाउंटने हा भन्नाट मिनी मिरची कटर बनवला आहे. यासाठी त्याने प्लास्टिकची गोल आकाराची एक रिकामी डबी घेतली. या डबीच्या झाकणाला लहानसे भोक पाडून त्यामध्ये डीसी मोटर [dc motor] बसवून तिला डिंकाच्या मदतीने झाकणाला चिकटवून घेतले. नंतर दोन पीयूसीचा एक गोलाकार तुकडा झाकणाच्या आतून डीसी मोटरवर चिकटवला.

boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
Electric Cycle
Doodleची इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला एम एस धोनी, व्हिडीओ झाला व्हायरल
Bengaluru woman slammed for phone
स्कुटर चालवताना मोबाईलवर बोलण्यासाठी काकूंचा हटके जुगाड! व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच

हेही वाचा : Video : वाह! फॉरेनर दाखवतोय महाराष्ट्रीयन ‘कांदे-पोहे’ रेसिपी! “आम्हाला मुलगा पसंत आहे!” म्हणाले नेटकरी

आता कटर बनवण्यासाठी व्यक्तीने एक ब्लेड घेतली आणि त्याचे उभे दोन तुकडे केले. हे तुकडे झाकणावर चिकटवलेल्या पीयूसीच्या तुकड्यावर लावून, ब्लेडवरून पीयूसीचा दुसरा गोलाकार तुकडा चिकटवण्यात आला आहे. आता झाकणाच्या वरच्या भागावर मिरची जाईल इतपत एक भोक पाडून घेतले. सर्वात शेवटी हे मिनी मिरची कटर सुरू होण्यासाठी एक चार्जिंग मॉड्युलर आणि इतर गोष्टी बसवल्या आहेत. व्हिडीओच्या शेवटी, अगदी काही मिनिटांत तयार झालेल्या या मिनी मिरची कटरमधून एक-दोन मिरच्या बारीक करून दाखवल्याचे, शेअर झालेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकतो.

हा भन्नाट जुगाड पाहून त्यावर नेटकऱ्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत ते पाहू.

“खूप भारी! पण, हे मशीन साफ कसं करता येईल?” असा प्रश्न एका युजरने केला आहे. दुसऱ्याने, “चिरलेली मिरची काढताना बोटाला ब्लेड नाही का लागणार?” असे विचारले आहे. “मस्तच, माझा नवरा एसी दुरुस्तीची कामं करतो… हे कटर बनवून द्यायला मी त्याला सांगणार आहे.” असे तिसऱ्याने लिहिले आहे. “वाह! काय डोकं लावलंय! मस्त” असे चौथ्याने लिहिले आहे. शेवटी पाचव्याने, “आता टोमॅटो चिरण्यासाठीपण एक मशीन बनवून दाखवा” असे म्हटले आहे.

हेही वाचा : बोली असो वा प्रमाण, मराठी भाषेची गोडी तुमच्या मुलांना कशी लावाल? ‘खलबत्ताशी’ खास बातचीत…

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर शेअर झालेल्या या भन्नाट व्हिडीओला आत्तापर्यंत ७.२ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.