Bike Stunts Viral Video : वाहतूक नियमांचे उल्लंघन करून काही तरुण हायवेवर धोकादायक स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी काही माणसं धोकादायक रायडिंग करत असतात. इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल करून प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न करणं काही जणांच्या अंगलट आल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. पण एका पठ्ठ्याने एक हात सोडून दुसऱ्या हातात बिअरची बाटली घेऊन स्टंटबाजी करण्याचा धक्कादायक प्रकार केला आहे. हायवेवर बुलेटची रायडिंग करताना वाहतूक नियमांना धाब्यावर बसवून भर रस्त्यात एक तरुण बिअर पित असल्याचा व्हिडीओ समोर आला. हेल्मेट न घालणे, दारु पिऊन दुचाकी चालवताना रील बनवणे एका तरुणाला चांगलचं महागात पडलं आहे. या तरुणाच्या हिरोगिरीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला पोलीसी खाक्या दाखवल्या आहेत.

दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेवर स्टंटबाजी

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ गाजियाबाद येथील असल्याचं बोललं जात आहे. एक तरुणी दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेवर स्टंटबाजी करताना व्हिडीओत दिसत आहे. हा तरुण इतका टशनमध्ये बुलेट रायडिंग करत होता की, एका हातात बुलेटचा हॅंडेल आणि दुसऱ्या हातात बिअरची कॅन असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ लोकेश राय नावाच्या युजरने ट्विटर शेअर केला आहे.

नक्की वाचा – जिवंत मगरीसोबत खेळ करायला गेला अन् काही सेकंदातच डाव पलटला, थक्क करणारा Video एकदा पाहाच

इथे पाहा व्हिडीओ

स्लो मोशनमध्ये रील बनवली

दुचाकी चालवताना त्या तरुणाने हेल्मेटही घातला नाही. बॅकग्राऊंडमध्ये एक गाणंही सुरु आहे. शहर तेरे में घूमे गाड़ी सिस्टम सारा हाले है, मन्ने सुनी तू ऑन रोड पर पैग मारता चाले है’ अशाप्रकारचं रील त्या तरुणाने स्लो मोशनमध्ये बनवली होती. ही रील त्या तरुणाने व्हायरल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३१ हजार रुपयांचा दंड

स्टंटबाजीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गाजियाबाद वाहतूक पोलिसांनी त्या तरुणाला ३१ हजार रुपयांचा दंड भरायला सांगितला, अशी माहिती समोर आलीय. एका रिपोर्टनुसार, बुलेट दुचाकी गाजियाबादमध्ये असालतपूर जाटव येथील रहिवाशी अभिषेकच्या नावावर नोंदणीकृत आहे. पोलिसांनी ऑनलाईन चलनाचा दंड घेतल्यावर त्याची सुटका केली असल्याचंही समजते आहे.