सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असत. काही व्हिडीओ विचार करायला लावतात तर काही शिकवून जातात. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, एक बाळ अंधारात अचानक कोणाला तरी बघून हाय करत. वडील, जेमी बोनेट आपल्या दोन वर्षांच्या मुलासह लोकी बोनेटसह बेडवर झोपलेले दिसतात. तेव्हा त्यांचा मुलगा अचानक लॅम्पशेडकडे बोट दाखवायला सुरुवात करतो जणू तो कोणाला तरी हाय म्हणत आहे.
नक्की काय होत?
बेडवर आपल्या वडिलांसोबत झोपलेलं बाळ अचानक हसूही लागते आणि खोलीच्या एका कोपऱ्याकडे बघून हाय करते. बाळ विचारत राहते ‘कोण आहे?’ पण त्याच्या वडिलांना समजत नाही.
(हे ही वाचा: वडिलांनी लग्नासाठी पाठवलेल्या मुलाला मुलीने दिली ‘ही’ खास ऑफर; चॅटची होतेय सर्वत्र चर्चा)
(हे ही वाचा: ‘सामी-सामी’ गाण्यावर आजीने केला जबरदस्त डान्स! व्हिडीओ सोशल मीडियावर viral)
कोणाला बघितलं बाळाने?
३० वर्षीय जेमीनुसार त्याच्या मुलाने कदाचित त्याची मृत आजी इसाबेल मॅथर्स यांना पाहिले असेल. आजीचा या वर्षाच्या सुरुवातीला वयाच्या ८७ व्या वर्षी कर्करोगाने मृत्यू झाला. मुलगा आजीच्या फार जवळ होता. तो असा दावा करतो की लाजाळू लोकी कुटुंबातील सदस्यांशिवाय कोणालाही हाय म्हणणार नाही.