Desi Jugaad Viral Video : सोशल मीडियावर देशी जुगाड करुन बनवलेल्या भन्नाट वस्तूंचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र, इंटरनेटवर नुकतच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनं सर्वांनाच चक्रावून सोडलं आहे. जुगाड करून एखादा माणूस काय करेल, याचा नेम राहिला नाही. कारण एका व्यक्तीने विश्रांती घेण्यासाठी चक्क ट्रकच्या चेसीजवळ बेड बनवला. ट्रक हायवेवर प्रवास करतानाही तो व्यक्ती बेडवर विश्रांती घेत असल्याचं एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. ट्रकमध्ये जुगाड करुन बनवलेल्या बेडचा व्हिडीओ पाहून लोक चक्रावून गेले आहेत. कारण अपघात होण्याची जराही भीती नसणारा माणूस धावत्या ट्रकमध्ये जुगाडू बेडवर आरामात झोपल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक ट्रक हायवेवरून वेगानं जात आहे. या धावत्या ट्रकमध्ये एका व्यक्तीने जुगाडू बेड बनवला आहे. या बेडवर तो आरामात झोपल्याचं पाहायला मिळत आहे. धावत्या ट्रकमध्ये बेड बनवून झोपणाऱ्या माणसांचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण कोणीही इतक्या खतरनाक पद्धतीने कसं काय झोपू शकतो? तुम्ही व्हिडीओत पाहू शकता की, या व्यक्तीने झोपण्यासाठी ट्रकच्या खाली एक खतरनाक बेड बनवला आहे. पण या व्यक्तीने अपघातालाही आमंत्रण दिल्याचं, नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे.
इथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ @indian_ka_talent नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाल्याने आतापर्यंत या व्हिडीओला १ कोटींहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसंच व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, याला मजबूरी म्हणायचं का..तर एका अन्य यूजरने म्हटलं, त्या व्यक्तीवर विनोद करु नका. परिस्थितीमुळं अशा गोष्टी घडतात.