प्राण्यांचे अनेक व्हिडीओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातील काही प्राण्यांशी करण्यात आलेली वागणूक आणि त्यांच्यावर होणारा अत्याचार यावरून रोज नवा वाद सुरू होतो. असाच नवा वाद एका व्हिडीओमुळे सध्या सुरू झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चक्क कुत्र्याबरोबर पॅराग्लायडिंग करताना दिसत आहे.
या व्यक्तीबरोबर पॅराग्लायडिंग करत असणारा हा कुत्रा घाबरलेला दिसत आहे, अशा कमेंट्स अनेक जणांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. पाळीव प्राण्यांवर अशाप्रकारे अत्याचार करणे चुकीचे असल्याचे म्हणत यावरून ट्विटरवर नवा वाद सुरू झाला आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
आणखी वाचा : “दिवाळी तरी…” मुख्यमंत्री शिंदेंना चिमुकल्याने खास वऱ्हाडी भाषेत लिहिलं शेतकऱ्यांचं गाऱ्हाण मांडणारं पत्र
व्हायरल व्हिडीओ :
या व्हिडीओला आत्तापर्यंत २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. काही जणांना हा कुत्रा आनंदी वाटत आहे तर काही जणांना तो घाबरलेला वाटत आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे