Shocking video: देशात कुठे फिरायला जायचे असेल तर लोकं आरामदायी प्रवासासाठी नेहमीच भारतीय रेल्वेचा वापर करतात. भारतीय रेल्वेचा प्रवास हा तसा परवडणारा असतो. त्यामुळेच लवकर तिकीट देखील मिळत नाही. रेल्वेतून तुम्ही योग्य तिकीट घेऊन प्रवास केला तर तुम्हाला कुठल्याच अडचणींचा सामना करावा लागत नाही. पण जर चुकीचे तिकीट घेऊन प्रवास करत असाल किंवा तिकीटच काढले नसेल तर रेल्वे अशा प्रवाशांवर कारवाई करण्यापासून थांबत नाही. यासाठी रेल्वेकडून सतत जनजागृती देखील होत असते. विना तिकीट ट्रेनने प्रवास करणे चुकीचे तर आहेच, पण तो कायदेशीर गुन्हाही आहे. ज्यासाठी दंड, तुरुंगवास किंवा दोन्हीची तरतूद आहे. दरम्यान अशाच एक व्यक्तीनं रेल्वेचे तिकीट नसल्याने टीसी कडून आपल्यावर कारवाई होईल या भीतीपोटी एका तरुणाने व्यक्तीनं धावत्या रेल्वेमधून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओही सध्या समोर आला असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

दर दिवशी मोजणंही अशक्य होईल इतकी मंडळी रेल्वेनं प्रवास करतात. पण, या साधनाचा फायदा घेत असताना किमान दरात उपलब्ध असणारी तिकीच काढणंही बऱ्याचदा टाळलं जातं. एसी लोकलमध्येही हल्ली असा फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बस प्रवास, रेल्वे प्रवासात वादविवाद होणे काही नवीन नाही. अनेकदा तिकिटावरुन कंडक्टर, टीसीसी वाद झाल्याच्या घटना अनेकदा पाहायला, ऐकायला मिळतात. असाच एक धक्कादायक प्रकार सध्या समोर आला आहे, यामध्ये फक्त एका तिकीटासाठी व्यक्तीनं आपला जीव

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती ट्रेनच्या दरवाजात उभा आहे. यावेळी तिथे उभे सगळे त्या व्यक्तीला आतमध्ये येण्याची विनंती करत आहे. एवढंच नाहीतर टीसीही त्या व्यक्तीला आतमध्ये ये असं सांगत आहे. मात्र तो व्यक्ती कुणाचंही ऐकायला तयार नाही. काही लोक त्याला पकडण्यासाठी पुढेही जात आहे, मात्र यावेळी तो उडी मारण्याची धमकी देतो. पुढे व्हिडीओमध्ये खूप गोंधळ झाला असून कदाचीत त्याचवेळी त्या व्यक्तीनं खाली उडी मारली असावी.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर _rail_lovers_987 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरही थक्क झाले असून व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.