Man Jumped From The Bridge: सोशल मीडियावर स्टंटचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आहेत, तर यातील काही व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती स्टंट करण्याच्या नादात आपला जीव धोक्यात घालताना दिसतोय. व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या व्यक्तीवे चक्क चालत्या गाडीतून थेट पुलाखाली उडी मारली आहे. हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चालत्या कारमधून शेकडो फूट उंच पुलावरून उडी मारताना दिसत आहे. हा धोकादायक स्टंट पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत. चालत्या गाडीच्या छतावर एक माणूस बसलेला दिसून येतोय. ही कार एका पुलावरून जाताना दिसत आहे. गाडी अतिशय वेगाने पुलाच्या अगदी जवळून जाताना दिसून येतेय. गाडी पुलाच्या जवळ आल्यानंतर हा माणूस गाडीच्या छतावरून अचानक उडी मारतो. हे दृश्य फारच रोमांचक असून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पुलावरून उडी मारल्यानंतर हा व्यक्ती २-३ वेळा हवेतच कोलांट्या उड्या मारतो. या दरम्यान, व्हिडीओमध्ये वाजणारे संगीत तुम्हाला वेड लावण्यासाठी पुरेसे आहे. ती व्यक्ती थोडीशी खाली येताच त्याने आपले पॅराशूट उघडले. त्यानंतर तो आरामात खाली येतो. हे बघायला खूप मजा वाटत असली तरी यात खूपच धोका आहे.

आणखी वाचा : तुम्ही कधी इच्छाधारी नागिन पाहिलीय का? मग हा व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : डीजेच्या तालावर या मुलांनी इतका विचित्र डान्स केलाय की पाहून पोट धरून हसाल! पाहा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतका खतरनाक स्टंट यापुर्वी कधी पाहिला नसेल
कल्पना करा जर पॅराशूट उघडले नसते तर ही व्यक्ती इतक्या फूट उंचावरून खाली पडली असती. यात त्याच्या जीवाला देखील धोका पोहोचण्याची शक्यता होती. मात्र, असे धोकादायक स्टंट करण्यापूर्वी स्टंटमन सुरक्षिततेचे सर्व मानके तपासून घेतात. तेव्हाच तो असा धोकादायक स्टंट करण्याचा धोका पत्करतो. हा व्हिडीओ luxuriateworld नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.