Man Loses Testicles In Attack: गेल्या आठवड्यात पॅरिसमध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत झालेल्या पेन्शन सुधारणा निदर्शनादरम्यान एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याचे समजत आहे. फ्रेंच पोलिसाने एका आंदोलनकर्त्याला त्याला पायाच्या मधोमध मारल्याने टेस्टिकल्सला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांच्या काठीचा मार इतका तीव्र होता की यामुळे सदर व्यक्ती वेदनेने कळवळून उठली.हॉस्पिटलमध्ये नेल्यावर या व्यक्तीच्या टेस्टिकल्सवर शस्त्रक्रिया करावी लागली होती. दैनिक फ्रेंच वृत्तपत्र लिबरेशनने रविवारी प्रकाशित केलेल्या लेखात दिलेल्या माहितीनुसार टेस्टिकल्स गमावलेल्या या व्यक्तीने आता पोलिसांविरुद्ध कोर्टात खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘त्या’ आंदोलनात नेमकं काय घडलं?

पीडित व्यक्तीने मीडियाला सांगितले की, “पोलिसांच्या हिंसाचारामुळे जखमी झालेला मी पहिला माणूस नाही. मी आता खटला दाखल करणार आहे जेणेकरून हा अत्याचार थांबेल.” सदर घटनेचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही घटना गुरुवारी १९ जानेवारीला घडली होती ज्यात एक पोलीस कर्मचारी आंदोलनकर्ताच्या पायाच्या मधोमध मारताना दिसत आहे. फ्रेंच प्रेसचा अभियंता इव्हान एस या २६ वर्षीय व्यक्तीवर आपल्या कॅमेराने शूट करताना हा हल्ला झाला होता.

प्राप्त माहितीनुसार आंदोलनकर्ते आणि पोलिस यांच्यातील संघर्षादरम्यान फोटो काढताना एका अधिकाऱ्याने इव्हानला कथितरित्या त्याला जमिनीवर पाडले तर दुसऱ्याने काठीने माणसाच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला. पॅरिसचे पोलिस प्रमुख लॉरेंट नुनेझ यांनी या घटनेच्या नेमक्या कारणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत

इव्हानच्या वकील लुसी सायमन यांनी सांगितले की “हा इतका जोरदार हल्ला होता की इव्हनला स्वतःचे टेस्टिकल काढून टाकावे लागले. माझा क्लायंट अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे. हा हल्ला स्वसंरक्षण किंवा आवश्यकतेमुळे झालेला नाही याचा पुरावा आमच्याकडे असलेल्या फोटोमध्ये आहे आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली नव्हती. इव्हान अजूनही धक्क्यातून सावरलेला नाही”.

हे ही वाचा<< बिघडलेल्या Escalator ने गिळला माणूस; मेट्रो स्टेशनवरील Video पाहून पायाखालची जमीन हादरेल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, निवृत्तीचे वय वाढवण्याच्या सरकारच्या योजनेला विरोध करण्यासाठी गुरुवारी फ्रान्समधील शहरांमध्ये सुमारे १ दशलक्ष लोकांनी मोर्चा काढला होता ज्यात सदर घटना घडल्याचे समजत आहे.