scorecardresearch

Premium

मोमोज बनवण्यासाठी पठ्ठ्याने वापरले आजोबांचे प्लास्टिकचे नकली दात; Video तील किळसवाणा प्रकार पाहून युजर्स म्हणाले…

व्हिडीओत एक व्यक्ती मोमोजला आकार देण्यासाठी चक्क आजोबांच्या नकली प्लास्टिकच्या दातांचा वापर करत असल्याचे दिसत आहे.

man made momos with help of grandfathers fake teeth netizens were shocked to see unique method in viral video
मोमोज बनवण्यासाठी पठ्ठ्याने वापरले आजोबांचे नकली दात; Video तील किळसवाणा प्रकार पाहून युजर्स म्हणाले… (@wqbestfriends_ instagram)

बऱ्याच लोकांना मसालेदार मोमोज खायला खूप आवडतात. भाज्या आणि चिकनपासून बनवले जाणारे हे मसालेदार मोमोज ग्रीन चटणीबरोबर खाण्याची एक वेगळी मज्जा असते. विशेषत: तरुणांना मोमोजचे विविध प्रकार चाखायला आवडतात. त्यामुळे हल्ली शाळा, कॉलेज ते अगदी स्टेशनबाहेरील खाऊ गल्लीत तुम्हाला एकतरी मोमोजचा स्टॉल दिसून येईल. विविध आकारात हे मोमोज तयार केले जातात. पण, एका पठ्ठ्याने मोमोजला आकार देण्यासाठी अशी ट्रीक वापरली आहे जी पाहून तुम्ही मोमोज खाताना १०० वेळा विचार कराल. त्याची मोमोज बनवण्याची पद्धत पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिडीओत एक व्यक्ती मोमोजला आकार देण्यासाठी चक्क आजोबांच्या नकली प्लास्टिकच्या दातांचा वापर करत असल्याचे दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती मोमोज बनवताना दिसत आहे. या व्यक्तीची मोमोज बनवण्याची पद्धत सामान्य पद्धतीपेक्षा थोडी वेगळी आणि अनोखी आहे. कारण त्याने मोमोजला आकार देण्यासाठी चक्क त्याच्या आजोबांच्या नकली प्लास्टिकच्या दातांचा वापर केला आहे. यासाठी तो प्रथम दातांच्या खालच्या भागावर पीठापासून लाटलेली गोल पोळी ठेवतो. यानंतर त्यात स्टफिंग करतो आणि नंतर दातांच्या वरच्या भागाच्या मदतीने तो दाबतो. अशा प्रकारे तो मोमोजला आकार देत आहे.

mankind, earth, destruction, earth destruction marathi news
विनाशाच्या उंबरठ्यावरून मागे फिरण्याचं शहाणपण मानवजात दाखवेल का?
Mumbai Drunk Men Rob Assault Passenger Misbehaves With Young Girl Force Man To Chant Jai Shri Ram Near Byculla Y-Bridge
आधी लुबाडलं, अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला मग ‘जय श्री राम’ म्हणण्यासाठी चक्क..भायखळाच्या पुलावरील भीषण प्रकार
man-unique-trick-to-save-from-cold-put-fire-in-a-bicycle-seat-heated-instantly-viral-video
थंडीपासून वाचण्यासाठी हटके जुगाड! सायकलच्या सीटमध्ये टाकले जळत्या लाकडाचे तुकडे; Video एकदा बघाच…
Health Benefits of Eating Guavas
‘हे’ एक फळ खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी, साखर नियंत्रणात अन् बद्धकोष्ठता होईल दूर? समजून घ्या खाण्याची पद्धत तज्ज्ञांकडून…

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ wqbestfriends_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्यावर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे – हा कसला किळसवाणा प्रकार आहे? आता जेव्हा मी मोमोज खाईन तेव्हा मला ते आठवत राहील; तर दुसर्‍या युजरने लिहिले की, आता मोमोज खाण्यापूर्वी मला विचार करावा लागेल की, ते कसे बनवले जातात?

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man made momos with help of grandfathers fake teeth netizens were shocked to see unique method in viral video sjr

First published on: 02-12-2023 at 16:20 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×