व्यायाम करणं शरीरासाठी चांगलं असतं. नियमित व्यायाम केल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहातं. मन ताजंतवानं राहतं. रोगप्रतिकारशक्ती वाढते. शिवाय शरीरातील अवयवांचा एकमेकांशी उत्तम समन्वय साधला जातो. त्यामुळे नियमित व्यायाम करायला हवा. अर्थात व्यायाम करण्यासाठी हल्ली उत्तम प्रकारच्या जिम उपलब्ध झाल्या आहेत. जिथे अद्ययावत मशीन्स आणि ट्रेनर्सच्या मदतीने आपण योग्य प्रकारे व्यायाम करू शकतो. मात्र काही मंडळी जिममध्ये केवळ टाईमपास करण्यासाठी जातात. तिथे जाऊन स्टाईल मारण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही वेळेस ही स्टाईल अंगाशी देखील येते. आता हाच व्हिडीओ पाहा ना… तरुणीला इंप्रेस करण्याच्या नादात या तरुणाची कशी अवस्था झाली.

जीममध्ये व्यायाम करताना लोक अनेकदा रील आणि व्हिडिओ बनवताना दिसतात. काहीजण डंबेल घेऊन नाचताना दिसतात, तर काही अति जड उपकरणे उचलून बढाई मारण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जिममध्ये गेलात, तर तिथे असे लोक पाहिले असतील. सोशल मीडियावर जिममध्ये अपघाता संबंधित अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. असाच प्रकार या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये, व्यक्ती आवश्यकतेपेक्षा जास्त वजन उचलताना दिसत आहे, तेही फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी. व्यक्तीच्या खांद्यावर वजन आहे. तर दुसरे वजन गळ्यात लटकले आहे. इतके वजन उचलूनही त्या व्यक्तीला शांतता न मिळाल्याने त्याने तिसरे वजन उचलण्याचा प्रयत्न सुरू केला.

हा धोकादायक प्रयत्न करताच त्याचा तोल बिघडला आणि तो उपकरणासह जमिनीवर पडला.शल मीडियावर जिममध्ये अपघाता संबंधित अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. असाच प्रकार या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – ‘हॅलो गाईज खाना खा लो’ VIDEO शूट करताना अचानक आली आई अन् चिमुकलीची झाली धुलाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओमध्ये व्यक्ती थेट उपकरणावर पडल्याने गंभीर जखमी झाले असावा असं दिसत आहे. जिममध्ये असे धोकादायक कृत्य करण्याचा प्रयत्न करणारी ही पहिलीच व्यक्ती नाही, याआधीही अनेक जण व्हिडीओ आणि रील्स बनवताना अशा प्रकारच्या अडचणीत सापडले आहेत.