Jodhpur Rain Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक थरारक व धक्कादायक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. अनेकदा सोशल मीडियावर हसवणारे, मनोरंजनात्मक व्हिडीओ पाहायला मिळतात. पण, कधी कधी अशाच काही व्हिडीओंच्या गर्दीत असे काही क्षण टिपले जातात, जे पाहून क्षणभर श्वास रोखल्यासारखं वाटतं. राजस्थानातल्या जोधपूरमध्ये मुसळधार पावसात घडलेली ही घटना अंगावर शहारा आणणारी आहे. सोशल मीडियावर सध्या जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो पाहून कोणीही हादरून जाईल.
नेमकं काय घडलं?
राजस्थानमध्ये रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले असून, अनेक ठिकाणी धोकादायक दृश्ये समोर येत आहेत. सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून क्षणभर अंगावर काटा येईल. जोधपूरच्या पावटा परिसरात एका धक्कादायक घटना घडली.
व्हायरल व्हिडीओ पावसानंतरच्या दृश्याचा आहे. एका घराचं मुख्य गेट बंद आहे आणि एक जण गेटबाहेर उभा आहे. काही क्षणांतच तो गेट अचानक उघडतो आणि पुन्हा बंद करण्यासाठी पुढे सरसावतो; पण तो गेट व्यवस्थित बंद करीत असतानाच एक विचित्र गोष्ट घडते. डाव्या बाजूचं गेट आणि त्यासोबतची संपूर्ण भिंत काही सेकंदांतच कोसळते. पाहता पाहता दरवाजा आणि भिंत जमीनदोस्त होते. सर्वांत थरारक गोष्ट म्हणजे तो माणूस केवळ काही इंचांनी त्या ढिगाऱ्याखाली येण्यापासून वाचतो. जर तो दोन सेकंद तेथून उशिरा हलला असता, तर हे प्रकरण त्याच्यासाठी प्राणघातक ठरलं असतं.
हा थरारक व्हिडीओ ‘X’ प्लॅटफॉर्मवरील loksattalive या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.
त्यावर अनेकांनी कमेंट्स करीत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं लिहिलं, “खरंच नशीबवान आहे तो, वेळेवर गेट सोडलं नसतं, तर फार मोठं नुकसान झालं असतं.” दुसऱ्या युजरनं म्हटलं, “गेटला कुंडी लावली असती, तर भिंत उभी राहिली असती कदाचित.”
भिंतच का कोसळली?
या घटनेतून एक स्पष्ट इशारा मिळतो. पावसाळ्यात बांधकामाच्या गुणवत्तेबाबत सतर्कता आवश्यक आहे. कमी दर्जाचं काम, भिंतींचा पाया योग्य नसणं अथवा पावसाचं पाणी भिंतींच्या आत शिरणं ही सर्व कारणं घर कोसळण्यास कारणीभूत ठरू शकतात.
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ पाहून एक गोष्ट नक्की पटते की, अपघात कधी आणि कुठे घडेल ते सांगता येत नाही. पण थोडेसे सावधगिरीने वागलो वा वावरलो, तर मोठ्या अनर्थापासूनही स्वतःचा जीव कदाचित वाचवू शकतो.