स्थानकाबाहेर एका व्यक्तीने लघुशंका केल्यामुळे रेल्वेने त्याला लघुशंका साफ करण्याचा दंड केला आहे. ही घटना इंग्लंडमधील वॉर्सेस्टर शहरात घडली आहे. BTP3Counties ने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर या घटनेची माहिती फोटोसह पोस्ट केली आहे.

एका व्यक्तीने टॉयलेटला न जाता रेल्वे स्थानकाबाहेरच लघुशंका केली. रेल्वे अधिकाऱ्याला ज्यावेळी या घटनेची माहिती मिळाली. त्यावेळी अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला सर्वात आधी रेल्वेनं प्रवास करण्यापासून थांबवले. आणि शिक्षा म्हणून स्वत:ची लघुशंका साफ करायला लावली.यावेळी त्या अधिकाऱ्याने इतर सर्व नागरिकांना चेतावनी दिली की, यानंतर आणखी कोणी असे केल्यास त्यांनाही अशीच शिक्षा केली जाईल.

BTP3Counties ने केलेल्या ट्विट करत म्हटलेय की, आजची सर्वात महत्वाची गोष्ट, जर तुम्ही रेल्वे स्थानकावर लघुशंका करण्याचा विचार करत असाल तर हातात बादली आणि झाडूने रेल्वे स्थानक साफ करायला तयार राहा. आणि तुम्हाला रेल्वेने प्रवास करता येणार नाही. जसे आज वॉर्सेस्टरमध्ये या व्यक्तीसोबत झालं. तूम्ही तशी चूक करू नका.

या सर्व प्रकारानंतर अनेकांनी ट्विट करत रेल्वेला पाठींबा दर्शवला आहे. रेल्वेने त्या व्यक्तीला दिलेल्या दंडाचे कैतूक सोशल मीडियावर होत आहे. असेच काम करत राहा, असे ट्विट एका नेटकऱ्यांनी करत रेल्वेला आपला पाठीबा दर्शला आहे.