Mumbai Local Viral Video : मुंबई लोकल ही अनेक मुंबईकरांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनली आहे. गर्दीतून वाट काढत अनेक मुंबईकर जीव मुठीत घेऊन या लोकलने प्रवास करतात. या लोकलने प्रवास करताना काही प्रवासी जीवाची पर्वा न करता अतरंगी आणि भीतीदायक स्टंट करताना दिसतात. सध्या मुंबई लोकल ट्रेनमधील असाच एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एक तरुण धावत्या लोकलच्या दरवाजावरील हँडलला पकडून खतरनाक स्टंटबाजी करताना दिसतोय. या जीणघेण्या स्टंटबाजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धावत्या लोकलमध्ये तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक प्रवासी धावत्या ट्रेनच्या बाहेर लटकून प्लॅटफॉर्मवरून सरकत जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसतोय. तरुण आधी प्लॅटफॉर्मवर चालत असतो, ट्रेन सुरू होताच तो दरवाजाचे हँडल पकडतो आणि प्लॅटफॉर्मवरून घसरत जाऊ लागतो. ट्रेन जस जशी वेग वाढवते, त्या वेगाबरोबर तरुणही घसरत असतो. अखेर प्लॅटफॉर्म संपतो आण तो पुन्हा धावत्या ट्रेनमध्ये उडी घेत आत शिरतो. तरुणाचा हा जीवघेणा स्टंट पाहून उपस्थित लोकही आश्चर्यचकित झाले. युजर्स कमेंट सेक्शनमध्ये या व्यक्तीला प्रचंड ट्रोल करत आहेत.

sankarshan karhade share experience to visit raj thackeray home
“राज साहेबांनी घरी बोलावलं, ठाकरे-पवारांचा फोन आला अन्…”, संकर्षण कऱ्हाडेच्या ‘त्या’ राजकीय कवितेनंतर काय घडलं? म्हणाला…
A young boy K Ayushmaan Rao dresses up as Ram Lalla
चिमुकला रामलल्ला पाहिला का? रामलल्लांच्या वेषभूषेतील रामभक्ताचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”

पैसे कमावण्यासाठी भन्नाट जुगाड; महामार्गावरील रस्तादुभाजकाला लावल्या शिड्या अन्… पाहा video

मुंबई लोकलमधील या जीवघेण्या स्टंटबाजीचा हा व्हिडीओ @introvert_hu_ji नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता, ज्यावर युजर्स आता भरभरून कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘भाऊ, हे करण्यामागे कोणती मजबुरी आहे?’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘अशा प्रकारचा स्टंट त्याचा जीवही घेऊ शकतो.’ याशिवाय इतर अनेक युजर्सनी हा केवळ मूर्खपणाचा कळस असल्याचे म्हटलेय.