Viral video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. काही व्हिडिओ कॉमेडी असतात तर काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे असतात. हल्ली तर अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक मुलीसाठी तिचे बाबा हे सूपरहिरो असातात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ देखील तसाच आहे. ज्यामध्ये एका वडिलांनी आपल्या मुलांसाठी सुपरहिरोसारखे धावून आले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती त्याच्या बाईकचे लॉक उघडत आहे. यावेळी त्याची लहान मुले मागेच उभी आहेत. यावेळी या व्यक्तीला मुलांच्या मागून एक भरधाव वेगात कार येताना दिसते. यावेळी तो क्षणाचाही विलंब न करता स्वत:चा जीव धोक्यात घालत मुलांना जवळ घेत तिथून मागे खेचतो. वडिलांच्या एका कृतीनं लहान मुलांचा जीव वाचला. वडिलांनी एक सेकंदही उशीर केला असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Family_viralvid पेजने शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> निसर्गापुढे काहीच नाही! घाटात अचानक दरड कोसळली; लोक ओरडत राहिले अन्…थरारक VIDEO
हा व्हिडीओ पाहून लोक प्रशंसा करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओचे लोक कौतुक करत आहेत. यासोबतच मुलांच्या वडिलांचेही खूप कौतुक केले जात आहे. कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, ‘त्याला अॅक्शनमध्ये येण्यासाठी फक्त एक सेकंद लागला.’ आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले, ‘ओह गॉड, दोन लहान मुलांचा सुपरहिरो बाप, देवाचे आभार की त्यांना असा बाप मिळाला.’ यावर टिप्पणी करताना आणखी एका युजरने लिहिले की, ‘तो खरंच मुलांसाठी खरा सुपरहिरो आहे.’