Wedding Viral Video : एकीकडे माहागाईच्या झळा गोरगरीबांना बसत असतानाच दुसरीकडे मात्र गुजरातमध्ये नोटा उधळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्नसोहळ्यात नवरा-नवरीचं स्वागत करण्यासाठी बॅंड बाजा बारात असतेच. पण वऱ्हाड्यांना खूश करण्यासाठी पंचपक्वानाची मेजवानी नाही, तर चक्क नोटांचा पाऊस पाडल्याचा प्रकार एका लग्नमंडपात घडला. अक्षय पटेल नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील एका माजी सरपंचाच्या भाच्याच्या लग्नात लाखो रुपये हवेत उडवल्याचे कळते आहे.

लग्न कुणाचं होतं?

लग्नसोहळा सुरु असताना इमारतीच्या गच्चीवरून नोटांचा पाऊस पाडल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. लग्नसोहळा थाटात व्हावा, असं सर्वांनाच वाटतं. पण गुजरातमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाने चक्क लाखो रुपयांची उधळण केली. गच्चीवरून नोटा फेकल्यानंतर लोकांनी एकच गर्दी केल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. पाहुण्यांना खूश करण्यासाठी नोटांची अशाप्रकारे उधळण केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इमारतीच्या टेरेसवरून १०० आणि ५०० रुपयांच्या नोटा हवेत उडवल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. पैसे गोळा करण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

नक्की वाचा – Viral: भावाचा नादच खुळा! स्कुटीला फॅन्सी नंबर लावण्यासाठी १.१२ कोटींची लावली बोली, ‘हा’ नंबर पाहून व्हाल थक्क

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुजरातमध्ये सांस्कृतीक कार्यक्रमातही लाखो रुपयांची उधळण केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गाण्यांचे कार्यक्रम, लग्नसोहळा तसेच इतर मोठ्या कार्यक्रमात नोटांचा पाऊस पाडण्याची पद्धत गुजरातमध्ये जुनी असल्याचं बोललं जात आहे. पैशांची उधळण केल्याचा हा व्हिडीओ पाहून नेटकरीही अवाक झाले आहेत. गरीब लोकांना वाढत्या महागाईचे चटके बसत असतानाच गुजरातमध्ये नोटांची उधळण केल्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली आहे.