रुबिक्स क्यूब तुम्ही कधी खेळून पाहिलंय का? बऱ्याचदा ते आपल्याला पहिल्या प्रयत्नात जमत नाही. कधी दुसऱ्या प्रयत्नात जमतं. पण हा खेळ खेळणं म्हणजे बुद्धीचा कसं लागण्यासारखं आहे. त्याचवेळी कमी वेळेत अगदी उत्तम पद्धतीनं हा खेळ खेळणाऱ्यांचा कस लागतो. हा रुबिक्स क्यूब सोडवता सोडवता नाकी नऊ येतात, तो खेळ या पठ्ठ्यानं एका सेकंदात सोडवलं. यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ट्विस्ट आहे तो पाहून तुम्ही थक्क व्हाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की खुर्चीवर दोन मुले बसलेले दिसत आहेत. एक मुलगा दुसऱ्या मुलाच्या हातात रुबिक्स क्यूब देतो. त्यानंतर हा मुलगा सुरूवातीला रुबिक्स क्यूब व्यवस्थित पाहून घेतो. हातात घेऊन ते सोडवण्यासाठी पाहत असतो. रुबिक्स क्यूब तो तयार होतो आणि आपल्या डोळ्याच्या पापण्या लवण्याआधीच तो रुबिक्स क्यूब सोडवतो. टेबलासमोर ठेवलेला टायमरमध्ये दिसतंय की तो किती वेळात हा रुबिक्स क्यूब सोडवतो.

आणखी वाचा : हम साथ साथ है! माकडांचा हा VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांना आठवला महामारीचा काळ

हा व्हिडीओ ‘हायड’ नावाच्या कलाकाराच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. “रुबिक्स क्यूब वर्ल्ड रेकॉर्ड- १.२६ सेकंद,” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. त्याच्या या अनोख्या कौशल्याचं सर्वजण कौतुक करत आहेत. तसंच हा व्हिडीओ पाहून या मुलाने एका सेकंदात हा रुबिक्स क्यूब कसा काय सोडवला, याची उत्सुकता लोकांमध्ये निर्माण झाली आहे. हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करताना दिसून येत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत ३.४ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. सुप्रसिद्ध क्रिकेटर शिखर धवनने सुद्धा या व्हिडीओला लाईक केलंय.

आणखी वाचा : कांगारूची एका व्यक्तीसोबत जबरदस्त फाईट, रागाच्या भरात त्याला इतका आपटला की.. पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : शंभरी पार केलेल्या आजीबाईंनी पॅराजम्पिंग करत रचला वर्ल्ड रेकॉर्ड, पाहा हा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी यावर युक्तीवाद सुरू केलाय. या मुलाने रुबिक क्यूब आधीच सोडवला होता, असं काही युजर्सचं म्हणणं आहे. तर काही युजर्सनी या मुलाने खरोखरंच विक्रम केला असल्याचं सांगितलं आहे. सर्वांची उत्सुकता पूर्ण करण्यासाठी कलाकाराने शेवटी व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन व्हिडीओ खरा नसल्याचं सांगितलं आहे. “हा एक विनोद आहे, मी एक जादूगार आहे,” असं त्याने कमेंटमध्ये लिहिलं आहे.