फिरायला कुणाला नाही आवडत. फिरण्याची आवड असणारे तर सतत कुठे ना कुठे फिरत असतात. त्यात प्रत्येकाची अशी इच्छा असते की एकदा तरी जगभ्रमंती करावी. आता अशी कल्पना करा. की ही जगभ्रमंती करण्याची तुमची इच्छा पूर्ण होते. त्यासाठी तुम्ही लाखो रुपये खर्च करता आणि चक्क अख्ख जहाज बूक करता, मात्र ते जहाज तुम्हाला न घेताच पुढे निघून जाते. गोंधळलात ना? अशी कल्पना करयालाही नको वाटतं ना, मात्र खरोखरच एका व्यक्तीसोबत हे घडलं आहे. सध्या याचीच सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र नक्की असं काय घडलं चला तर जाणून घेऊया.

जगभ्रमंतीसाठी १७ लाख रुपये खर्च करुन बूक केलं जहाज

त्याचं झालं असं की, एका ७२ वर्षीय व्यक्तीनं जगभ्रमंती करण्यासाठी चक्क १७ लाख रुपये खर्च करुन अख्ख जहाज बूक केलं. मात्र हे जहाज या व्यक्तीला न घेताच निघून गेलं. मात्र यामागचे खरं कारण एकून तुम्हीही शॉक व्हाल. हा व्यक्ती जहाजात बसला मात्र अचानक त्याला अस्वस्थ वाटू लालगे आणि उलटीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याला तात्काळ जहाजातील डॉक्टरांकडे घाऊन जाण्यात आले. या डॉक्टरांनी त्याला पुढचा प्रवास करण्यासाठी बंदी घातली आणि प्रवास टाळण्याचा सल्ला दिला. फिलीपींस हे जहाजातून उतरले आणि चेकअप साठी गेले तेव्हा सुदैवाने, हे उष्माघाताचे सौम्य प्रकरण असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा – video: विमानात तुंबळ हाणामारी; खिडकीची काचही फुटली, करावं लागलं इमर्जन्सी लँडिंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जगभ्रमंतीचं स्वप्न अर्धवटच राहिलं

अखेर फिलीपींस फ्लाईटने त्यांच्या घरी गेले आणि यामध्ये कोणाचाही दोष नसल्याचं त्यांनी सांगितले. तसेच जहाजात असलेले त्यांचं सामानही लवकरच त्यांना मिळेल अशी माहिती जहाजातील कर्मचाऱ्यांनी दिली आहे. मात्र फिलीपींस यांचं जगभ्रमंती करण्याचं स्वप्न अर्धवटच राहिलं.