हल्ली मोमोज म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. लहानांपासून मोठेही आवडीने मोमोज खातात. यामुळे अनेक प्रकारच्या मोमोजचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, ज्यामुळे फूडी लोक हे वेगवेगळे प्रकार सतत ट्राय करत असतात. यात सोशल मीडियावर सध्या मोमोजचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. यात मोमोज चिकन किंवा व्हेजिटेबल नाही तर चक्क जिवंत किडे भरून तयार केले जात आहेत. त्यामुळे मोमोजचा हा प्रकार पाहूनच अनेकांना उलटीसारखे होईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती मोमोज बनवताना दिसत आहे. तुम्ही आजवर चिकन, व्हेज किंवा पनीर मोमोज खल्ले असतील, पण या व्यक्तीने मोमोजमध्ये असे काही भरले की, पाहून सर्वांना धक्काच बसला. त्या व्यक्तीने मोमोजमध्ये चक्क जिवंत किडे भरले, त्यानंतर मोमोजला शेप देत ते वाफवले. एवढेच नाही तर त्या व्यक्तीने मोमोज वाफवून लोकांना दाखवलेही. काहींनी हा व्हिडीओ चीनमधील असल्याचा दावा केला आहे.
यामध्ये एका व्यक्तीने सर्वात आधी मोमोजसाठी मळलेला पीठाचा गोळा नीट लाटला. यानंतर त्याने मोमोजमध्ये थोड्या धान्यांसह किडे भरले. त्या व्यक्तीने मोमोजमध्ये किडे भरले आणि छान पॅक केले. यावेळी मोमोजमधून एक किडाही बाहेर आला. त्यानंतर त्या व्यक्तीने मोमोज थेट स्टीमरमध्ये टाकले आणि नंतर ते वाफवले. काही वेळाने त्या व्यक्तीने मोमोज बाहेर काढले तेव्हा आतमध्ये किडे चांगले शिजले होते. यानंतर त्या व्यक्तीने मोमोज तोडून तो लोकांना दाखवला.
हा व्हिडीओ @chinesestreetfood2023 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे, तर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, करोना पसरल्यानंतरही या देशात सुधारणा होत नाहीये. अजून एका व्यक्तीने लिहिले की, आता चीन आणखी एक महामारी पसरवण्याच्या तयारीत आहे.