Viral video: ‘स्पर्श’ या गोष्टीत अशी ताकद आहे की, जी माणसाला सुखावते तरी किंवा आयुष्यभरासाठी नकोशा गोष्टींची आठवण करून देणारी राहते. सार्वजनिक ठिकाणी परक्या लोकांनी जबरदस्तीने केलेल्या स्पर्शांनी कित्येकींना त्यांच्या आयुष्यात दुःखाचे क्षण दिले आहेत. त्या स्पर्शाला प्रतिकार करणे म्हणजे अब्रू राखणे हा समज रूजेल तेव्हाच हे नकोसे स्पर्श थांबतील.
आपण अनेकदा समाजकंटकांना आपल्या आजूबाजूला मुलींची छेड काढताना पाहिलं आहे. कधी हे समाजकंटक रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना महिलांना अपशब्द वापरून त्रास देतात तर कधी त्यांचा पाठलाग करताना दिसतात. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत, ज्यामध्ये मुली धाडस दाखवत अशा लोकांना योग्य धडा शिकवताना दिसतात. मुली सार्वजनीक ठिकाणीही आता सुरक्षित नाही याचंच एक उदाहरण सध्या समोर आलं आहे. काही विचित्र लोक गर्दीचा फायदा घेत महिलांवर अत्याचार करतात. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे, ज्यामध्ये एक तरुण गर्दीचा फायदा घेत महिलेला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही संताप होईल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती बसमध्ये तरुणीच्या बाजूला बसला आहे. यावेळी तो हळू हळू तरुणीला अश्लील स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय. तो मुद्दाम तरुणीच्या छातीला आपल्या हाताच्या कोपरानं स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान या तरुणीसोबत असलेली आणखी एक तरुणी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद करते आणि थोड्याच वेळात सीटवरुन उठत थेट या व्यक्तीच्या कानाखाली लगावते. यावेळी या व्यक्तीला ती मोठमोठ्यानं त्यानं केलेल्या कृत्याचा जाव विचारत आहे. यावेळी हा व्यक्ती मान्य करायलाच तयार नसून शेवटी तो हात जोडून तरुणीची माफी मागताना दिसत आहे.
बऱ्याच वेळा हे विचित्र लोक चालत्या बसमध्ये महिलांचा विनयभंग करताना दिसतात आणि जेव्हा महिलांनी विरोध केला तर त्याऐवजी त्यांच्यावरच हल्ला करतात. अशा लाजिरवाण्या घटनांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात, ज्यांना पाहून लोकही संतापतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
@IndiaObserverX नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अनेकजण यावर वेगवेगळ्या प्रतिक्रया देत आहेत. एका यूजरने लिहिले…”तरुणीला सलाम” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…”जर लोकांनी या व्यक्तीला अद्दल घडवली असती तर तो पुन्हा असे कधीही करू शकला नसता.”