घरात असलेल्या पाळीव प्राण्यांसोबत माणसांनाही बागडायला आवडतं. मांजर, श्वानासोबत खेळतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे आपण अनेकदा पाहिलं असेल. पण जंगलात मुक्त संचार करणाऱ्या वन्य प्राण्यांचा पाळीव प्राण्यांप्रमाणे खेळ करायला जाणं किती महागात पडू शकतं, हे एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. एका पठ्ठ्याने मांजर नाही, श्वान नाही, तर चक्क जंगलचा राजा सिंहाच्या कळपासोबतच खेळायचं ठरवलं. पण हा थरारक खेळ स्वत:च्याच अंगलट येऊ शकतो, याची जराही कल्पना या तरुणाला नसावी. सिंहांसोबत बागडायला गेल्यानं एका तरुणाला अद्दलच घडली आहे हे तुम्ही व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहू शकता.

एक तरुण सिंहांच्या कळपासोबत मस्ती करताना व्हिडीओत दिसत आहे. पण त्या तरुणाला बागडताना पाहिल्यावर सिंहांनी अचानक त्याच्यावर झडप घातली. या घटनेचा संपूर्ण थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा थरारक व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सिंहांनी आपल्यासोबत बागडणाऱ्या तरुणावर झडप टाकली पण त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.

नक्की वाचा – संतापजनक! शिक्षिका विद्यार्थ्यांसोबत भोजपूरी गाण्यावर थिरकली, शाळेतील Viral Video पाहून नेटिझन्स म्हणाले, “शिक्षक आयटम डान्सर नाहीत…”

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @gir_lions_lover या नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला जवळपास १.६ मिलियन व्यूज मिळाले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कमेंट्सचा वर्षावही केला आहे. एका युजरने तरुणाला म्हटलं, आता तुला समजलं असेल, सिंहाला जंगलाचा राजा का म्हणतात, तो गेंडा किंवा हत्ती नाही. तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं, मस्ती कुत्र्यांसोबत करतात सिंहासोबत नाही.