Viral Video : तुम्हाला प्रवासादरम्यान अनेकदा असे दृश्य पाहायला मिळतं की, शहरात रस्त्याच्या कडेला थांबून लोक लघुशंका करत असतात. अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणं हे योग्य नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. पण, लोक कारवाईची भीती न बाळगता खुलेआमपणे असे प्रकार करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात महापालिकेने रस्त्यावर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीला चांगलाच धडा शिकवला आहे. पण, पालिकेने त्या व्यक्तीकडून दंड वसूल न करता थेट अशी काही शिक्षा दिली की, तो आयुष्यात पुन्हा रस्त्यावर लघुशंका करणार नाही.
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभं राहून लघुशंका करत असतो. ये-जा करणारे लोकही त्याला ओरडतात, पण तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. तेवढ्यात महापालिकेचा पाण्याने भरलेला एक टँकर तिथे पोहोचतो, यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता, टँकरला जोडलेल्या पाईपने त्याच्या अंगावर पाण्याचा जोरदार प्रवाह फवारला जातो. यावेळी लघुशंका करणाऱ्या व्यक्तीला कळण्याच्या आतच तो पूर्णपणे भिजतो. यावेळी तो हात वर करून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण पाण्याच्या दाबामुळे त्याला तिथून पळून जाणंही जमत नाही.
महानगरपालिकेने या संपूर्ण कारवाईचा व्हिडीओदेखील रेकॉर्ड केला होता, जो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ @Meenaks06356943 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यावर लोकही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. काही लोक म्हणत आहेत की, ‘हे बरोबर केलं, असाच धडा शिकवला ना तर शहर अस्वच्छ होण्यापासून वाचेल. काही लोकांनी याला “मोबाईल बाथिंग सिस्टम” असे नाव दिले आहे, तर काहींनी म्हटले आहे की, “ही शिक्षा नाही, ही पब्लिक शॉवर आहे सर!”
एका युजरने कमेंट केली की, ते खूप धोकादायक लोक आहेत, ते घाण पसरवण्याची एकही संधी सोडत नाहीत. दुसऱ्याने लिहिले की, हा व्हिडीओ परदेशातील आहे, तर तिसऱ्याने लिहिले की, जर भारतात असे घडले तर प्रत्येक शहर स्वच्छतेत पहिल्या क्रमांकावर असेल.