Dadar shivaji park video: मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क हे मुंबईकरांचे फिरण्याचे हक्काचे ठिकाण मानले जाते. वृद्धांपासून तरुणांपर्यंत अनेक प्रकारचे लोक तुम्हाला तिथे पाहायला मिळतात. विशेषत: मुंबईकर तरुणांना रविवारी आणि सुट्ट्यांच्या दिवसांत खेळण्यासाठी शिवाजी पार्क हे हक्काचे मैदान आहे. या ठिकाणी क्रिकेटसह विविध प्रकारचे खेळ खेळणाऱ्या तरुणांची मोठी गर्दी असते. अनेक नोकरी-व्यवसाय करणारे लोक शिवाजी पार्क परिसरातील झाडांखाली विसावा घेताना दिसतात. मात्र, याच परिसरात एका व्यक्तीनं किळसवाणा प्रकार केला आहे. भरदिवसा त्यानं केलेल्या कृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल.
शिवाजी पार्क मैदानात अनेक खेळपट्ट्या असून तिथे क्रिकेटचा सराव आणि सामने होतात. फेरफटका मारण्यासाठीही अनेक जण पार्कात येतात. हे मैदान नेहमीच राजकीय सभांचे साक्षीदार राहिले आहे. येथे सभा घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ असते. याच मुंबईकरांचे हक्काचे मैदान असलेल्या या छत्रपती शिवाजी पार्कात अशाप्रकारची घटना घडणे ही खरंच एक संतापजनक गोष्ट असल्याचे मत अनेक जण व्यक्त करत आहेत.
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नेमकं घडलं तरी काय? तर झालं असं की, भरदुपारी एक व्यक्ती दादर शिवाजी पार्कमध्ये मैदानाच्या कडेला उघड्यावर लघवी करताना दिसला आहे. आपण कुठे काय करतोय याचंही त्याला भान राहीलं नाही. एवढंच नाही तर या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी त्या ठिकाणी बसलेली आहे, याचाही त्या व्यक्तीनं विचार केला नाही. अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी किळसवाणं कृत्य केल्यामुळे अनेक जण संताप व्यक्त करत आहेत.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर shivajipark_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून यावर नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलंय, “निर्लज्जपणाचा कळस, कुठे काय करता ह्याचंपण भान नाही”; दुसऱ्या एकानं, असे प्रकार खूपवेळा घडतात.. सध्याच आपल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधे एकाला तर फटकेपण दिले होते मी; पण आपलं छत्रपती शिवाजी महाराज पार्क फक्त मोठ मोठ्या लोकांचे कार्यक्रम असतील तेव्हाच आणि शिवजयंती असेल तेव्हाच चांगले असते आणि पोलिसांच्या परेड असतात तेव्हाच चांगले असते, बाकीच्या वेळेस दारूच्या बाटल्या तसेच सिगारेट ओढत बसलेले गर्दुल्ले असतात, लहान मुलांनी बघू नये अशा गोष्टी पण आपल्या पार्कमधे असतात. आमच्या समोर दिसेल तेवढे आम्ही उचलून त्याची विल्हेवाट लावतो, पण बाकीच्या वेळेस काय? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे, असा सवाल केला आहे. तर आणखी एकानं, “अरे जरा तरी लाज ठेवा”, दोन मिनिटांवर शौचालय आहे, तसेच बाजूला मुलगी बसली आहे, याच्या कानाखाली आवाज काढलाच पाहिजे”अशा अनेक संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.