Gas Lighter Jugaad Viral Video : गेल्या काही दिवसांपासून देशी जुगाडाचे भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण आता फॅशन संदर्भात व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण एका तरुणाने जबरदस्त जुगाड करून महिलेचे केस चक्क कर्ल केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. गॅस लायटरचा उपयोग गॅस पेटवण्यासाठी होतो, हे सर्वांनाच माहितीय. पण या तरुणाने गॅस लायटरचा अनोखा जुगाड करून महिलेच्या केसांना गोलाकार आकार दिला आहे. फॅशनच्या या जुगाडाचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ट्वीटरवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने महिलेच्या केसांना कर्ल करण्यासाठी भन्नाट जुगाड केला. या तरुणाने गॅसच्या लायटरचा वापर करुन महिलेच्या केसांना कर्ल केलं. गॅस लायटरचा अशाप्रकारे वापर केलेला पाहून लोकही चक्रावून गेले आहेत. पार्लरचा खर्च वाचवण्यासाठी लोक अनेक प्रकारचे जुगाड करतात. पण गॅस लायटरचा वापर करुन केसांना आकार दिल्याचा जुगाडू व्हिडीओ पाहून इंटरनेटवर अनेकांना धक्काच बसला आहे.

नक्की वाचा – Viral Video: तरुणीला रुग्णालयातच चढला शाहरुख खानच्या गाण्याचा फिव्हर, बेडवरून उठली अन् भन्नाट नाचू लागली

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, पत्नीला ही रील दाखवल्यानंतर तिने म्हटलं, हे तर काहीच नाहीय. १५ सप्टेंबरला शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत ३९ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांना या व्हिडीओला लाईकही केलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, आमच्या सब्सिडीचा चुकीचा वापर झाला आहे.