Man Quits Job Due To Travelling: ८ तास काम ८ तास कामाला जायची तयारी यामध्ये आयुष्य जात असल्याच्या अनेक तक्रारी सोशल मीडियावर मीम्स, पोस्ट्सच्या रूपात नेहमी ऐकायला वाचायला मिळतात. मुंबईत कामाला येणाऱ्या प्रत्येकाला हा अनुभव असेलच पण या तक्रारीला घेऊन रडत न बसता एका तरुणाने भन्नाट हिंमत दाखवली आहे.

दिल्लीच्या वायव्य भागात राहणाऱ्या या व्यक्तीने एका कंपनीत चांगल्या पगारात नोकरीची ऑफर स्वीकारली होती. पण नंतर, त्याच्या लक्षात आले की गुरुग्राममधील त्याच्या कामाच्या ठिकाणी जाणे खूप कठीण होऊ शकते, म्हणजे काम व प्रवास वगळता त्याच्याकडे दररोज फक्त ३ तासांचा मोकळा वेळ शिल्लक राहणार होता.

या तरुणाने लिहिले की मला पटकन कुठल्या गोष्टीला नाही म्हणता येत नाही. शिवाय ही संधी सुद्धा चांगली होती पण प्रवासासाठी वेळ व ५ हजार खर्च येणार होता. मी यावर काय करू हे कळत नाही, मी स्थलांतर करू शकत नाही.”एका दिवसापूर्वी शेअर केलेल्या पोस्टला जवळपास ४०० कमेंट मिळाल्या आहेत. यामध्ये नेटकऱ्यांनी सुद्धा त्याला आपल्या प्रवासकथा सांगितल्या आहेत. काहींनी त्याला नोकरीची संधी सोडू नको असे म्हटले आहे तर काहींनी तुला नक्की वेळ हवा आहे की नोकरी हे ठरव मग निर्णय घे असं लिहिलं आहे. म्हटले.

काय करायचं, नोकरी सोडायची की नाही?

नेटकरी म्हणतात…

हे ही वाचा<< ‘बाईपणा’च्या नावाखाली…भररस्त्यात वर्दीतील पोलिसांना कानाखाली मारलं; महिलेची भाषा ऐकून तुम्हीही भडकाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान तुमच्यापैकी अनेकांना सुद्धा हा प्रवासाचा त्रास रोजच्या रोज सहन करावा लागत असेल, मग अशा वेळी कामावर जाण्याची इच्छा कायम राहावी म्हणून आपण काय करता हे कमेंटमद्यह्ये कळवायला विसरू नका.