रेल्वे अपघाताच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. अनेकवेळा प्रवासी ट्रेनच्या दरवाजाला लटकून प्रवास करतात, तर कधी चालत्या ट्रेनच्या छतावरून प्रवास करताना प्रवासी अपघाताचे बळी ठरले आहेत.रेल्वेच्या खाली पडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या असतील पण रेल्वे अंगावरून गेल्यावरही जीव वाचण्याच्या घटना क्वचितच आपल्याला पाहायला मिळाल्या असतील. असाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून आख्खी रेल्वे अंगावरून गेली तरी नशीब बलवत्तर म्हणून एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ट्रेनच्या रुळावर पडलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक ट्रेन जात आहे, काही लोक हात वर करून ट्रेन थांबवण्याचा इशारा देत आहेत, पण जेव्हा ट्रेन थांबत नाही तेव्हा एक व्यक्ती चालत्या ट्रेनसमोर आडवा पडतो, त्यानंतर तिथे उभे असलेले लोक जोरात ओरडू लागतात. रेल्वे आल्यानतंर तो व्यक्ती तसाच झोपून राहिला, त्यामुळे त्याला कसलीच दुखापत झाली नाही. पण थोडी जरी चुक झाली असती तर सदर व्यक्तीला जीव गमवावा लागला असता. पण काही व्यक्तींचे नशीब बलवत्तर म्हणतात ना… तसाच काहीसा प्रकार घडला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ कुठला आहे यासंदर्भात माहिती मिळाली नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: नशिबी असे कसे हे मरण; नदीपात्रात अंत्यसंस्कार सुरु असताना अचानक पाण्याचा लोंढा, प्रेत गेलं वाहून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ आतापर्यंत १.६ मिलियन लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेक यूजर्स या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. एकाने या तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.