Maratha morcha mumbai csmt video: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे काल आझाद मैदानात दाखल झाले आहेत. मराठा आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत पोहोचले आहेत. त्यामुळे मुंबईची वाहतूक कोलमडल्याचे पाहायला मिळाले. ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा देणारे आंदोलक या ठिकाणी मोठ्या संख्येने दिसून आले. सीएसएमटी स्टेशनवर आणि मुंबईमधल्या अनेक भागांमध्ये मराठा आंदोलक दिसत होते. सोशल मीडियावर मराठा आंदोलनाचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. मुंबईत आंदोलकांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी पुन्हा एकदा मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलनाला सुरुवात केली आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. लाखो मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून, काही आंदोलकांनी मुंबई महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं होतं.
मात्र, मुंबईत आल्यानंतर आंदोलकांची मोठी गैरसोय झाली असल्याची तक्रार आंदोलक करीत आहेत. अनेक शौचालये, हॉटेल्स बंद असल्याची तक्रार आंदोलक करीत आहेत. त्यामुळे सीएसएमटी रेल्वेस्थानकात आंदोलकर्त्यांनी खाली बसत अखेर आराम केला आहे. तेथेच त्यांनी जेवणदेखील केलं आहे. याचदरम्यान कामाला जाणाऱ्या एका तरुणानं स्वत:चा डबा या आंदोलकांना दिला आहे, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीस यांना इशारा
“हॉटेल बंद करायला लावले, पाणी बंद करायला लावले म्हणून मराठा आंदोलक संतापले आहेत. मराठा आंदोलक वैतागावेत अशी जर तुमची ही भावना असेल, तर मग भाजपामधील मराठा कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं की, ???तुमचे मुख्यमंत्री गोरगरीब आंदोलकांना मुंबईत आल्यानंतर किती त्रास देत आहेत; पण मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या डोक्यातून हा गैरसमज काढून टाकावा, (एखादा शब्द गाळला गेलाय किंवा वाक्यरचना चुकलीय… एकमेकांशी जुळणे आवश्यक)??? तुम्हाला योग्य संधी आली तुम्ही मराठ्यांची मने जिंका. मराठा समाजाला आरक्षण द्या. हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाहीत. तसेच तुम्हाला वाटेल की, तुम्ही लाठीचार्ज वगैरे कराल, तर तुमच्या आयुष्यातील तो सर्वांत वाईट दिवस असेल. कारण- तुमच्यामुळे अमित शाह आणि मोदींनाही अडचण होईल. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे. पोलिसांना लाठीचार्ज करायला लावायचा आहे; पण आमच्या आंदोलकांना बोट लागता कामा नये. पुन्हा राज्य अस्थिर करू नका. जर राज्य अस्थिर झालं, तर त्याला जबाबदार मुख्यमंत्री असतील. फक्त मुंबई तुमची नाही. फक्त मुंबईनं तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही, तर अवघ्या महाराष्ट्रानं तुम्हाला मुख्यमंत्री केलं आहे. त्यामुळे तुम्ही अशी दुही निर्माण करू नका”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.