Maths Teacher viral video: विद्यार्थ्यांना गणितासारखा विषय हा कठीण वाटतो. अशावेळी शिक्षकांकडून विविध शक्कल लढवून शिकविण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. कारण विद्यार्थ्यांना जर शाळेत प्रश्न विचारला की, तुम्हाला कोणत्या विषयाची सगळ्यात जास्त भीती वाटते तर विद्यार्थी गणिताचा विषय अवघड जात असल्याचेच सांगतात. शाळेतील एक गोष्ट ही प्रत्येकाच्या न आवडती असते. ती म्हणजे गणित विषयाचा अभ्यास. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून अनेकांनी गणित विषयाचा अभ्यास करावासा वाटेल. मुलांना या भारतीय शिक्षकाची गणिताचा अभ्यास करण्याची सोपी पद्धत फारच आवडली आहे. या शिक्षकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गणिताचा वर्ग असलेला दिसत आहे. गणित विषयाच्या त्रिकोणमिती या विद्यार्थ्यांना हे शिक्षक शिकवताना दिसत आहे. विद्यार्थ्यांना गणितासारखा विषय हा आकृतींमुळे कठीण वाटतो. अशावेळी या आकृत्यांसाठी विविध शक्कल लढवून शिकविण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो. गणितासारखा कठीण विषय सोपा करण्यासाठी या विषयाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे पाढे, समीकरणे, वर्ग यासारखे पाठांतर करून घेणे महत्त्वाचे असते, यावर गणिताचे अनेक शिक्षक भर देतात. गणिताचा पाया असलेले समीकरण पाठ करण्यासाठी या व्हिडीओमधल्या शिक्षकांनी जी शक्कल लढवली ती पाहून तुम्हीही म्हणाल, गणितासाठी आम्हाला हाच शिक्षक हवा.

खरं तर या व्हिडीओमधील भारतीय शिक्षक हे एका म्यूजिकल फॉरमॅटमध्ये विद्यार्थ्यांना गणित विषय शिकवताना दिसून येत आहेत. यावेळी गणिताचा तास सुरू असताना शिक्षक सुरात भूमीतीची प्रमेय शिकवत आहेत. गुरुजी फळ्यावर रेखाटलेल्या आकृतीची एका गाण्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ओळख करुन देत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “या जागी सर्वसामान्य असता तर?” नागपुरात पोलीसाने दुचाकीवरील दाम्पत्यावर थुंकले; VIDEO पाहून सांगा हे कितपत योग्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @ArunSinghdeoria नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे आवर्जून सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. हा व्हिडीओ बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. नेटकऱ्यांनीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आमच्यावेळी असे शिक्षक हवे होते” “खूप छान अशा शिक्षकांची गरज आहे” “याला म्हणतात शिक्षक” अशा अनेक प्रतिक्रिया व्हिडीओवर आल्या आहेत.